मलगाव येथे १२ लाखांची गांजासदृष्य झाडे जप्त

एकाविरुद्ध गुन्हा दाखल
मलगाव येथे १२ लाखांची गांजासदृष्य झाडे जप्त

नंदुरबार | प्रतिनिधी

मलगाव ता.शहादा येथील कपाशीच्या शेतात ११ लाख ९० हजार रुपये किमतीचे १७० किलोग्रॅम वजनाचे २५० गांजासदृष्य झाडे पोलीसांनी जप्त केली. याबाबत एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मलगाव ता.शहादा येथील एका कपाशीच्या शेतात बेकायदेशीररित्या ११ लाख ९० हजार रुपये किमतीचे १७० किलो वजनाचे २५० गांजासदृष्य झाडांची लागवड केल्याचे आढळून आले.

याबाबत हेकॉ मेहरसिंग वनसिंग वळवी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अजय सुभाष पटले (रा.मलगाव ता.शहादा) याच्याविरुद्ध गुंगीकारक औषधीद्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८, २० (ब) आयआय प्रमाणे शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राहूलकुमार पवार करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com