Video नवापूर येथे भल्या पहाटे भीषण आग ; कोट्यवधींचे नुकसान

Video नवापूर येथे भल्या पहाटे भीषण आग ; कोट्यवधींचे नुकसान

नवापूर | श. प्र. Navapur

शहरातील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या विजय इलेक्ट्रॉनिक्स (Vijay Electronics) व खान ऑटो गॅरेजला (Auto garage) आज पहाटे ४ ते ५:२५ वाजेदरम्यान भीषण आग लागली. यात विजय इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानातील इलेक्ट्रॉनिकचे साहित्य जळून ८० ते ९० लाखांच्यावर नुकसान झाल्याची माहिती दुकान मालक विजय सोनवणे व हेमंत सोनवणे यांनी दिली.

आग विझविण्यासाठी सोनगड, नवापूर, नंदुरबार येथुन अग्रिशामक बंबाना पाचारण करण्यात आले होते. आग इतकी भीषण होती की दुकानातील टिव्ही, फ्रिज, पंखे, ए सी पुर्णपणे जळुन खाक झाले आहेत.

घटनेची माहिती मिळताच तहसिलदार मंदार कुलकर्णी, मुख्यधिकारी विनायक कोते, सहायक पोलिस निरीक्षक निलेश वाघ, उपनिरीक्षक मनोज पाटील, पोहेकॉ दादाभाई वाघ, योगेश तनपुरे, नितिन नाईक आदी घटनास्थळी पोहचून आग विझविण्यासाठी मदत केली.

नवापूर नगरपालिकेचा १०० नंबर बंद असल्यामुळे अग्रिशामक बंब उशिरा आल्याची माहिती दुकानदार हेमंत सोनवणे यांनी दिली. फोन लागला नाही म्हणून मी पंपहाऊसवर जाऊन अग्रिशामक बंबाला बोलविण्यासाठी गेलो अशी खत दुकानदार हेमंत सोनवणे यांनी व्यक्त केली.

यावेळी माजी नगरसेवक अजय पाटील, विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे, नगरसेवक आयुब बलेसरीया,आरीफ बलेसरीया, सुभाष कुंभार, विजय सैन सह सामाजिक राज्यकिय नागरीकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी मदत केली.

Video नवापूर येथे भल्या पहाटे भीषण आग ; कोट्यवधींचे नुकसान
बुस्टर डोससाठी पात्रता, अटी काय? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com