इमारतीवरुन पडल्याने महिला कामगाराचा मृत्यू

नवापूर येथील घटना
इमारतीवरुन पडल्याने महिला कामगाराचा मृत्यू

नवापूर | श.प्र.- NAVAPUR

येथील तलाठी कार्यालयाजवळ इमारतीचे बांधकाम सुरू असताना पाय निसटल्याने महिला कामगाराचा मुत्यू झाल्याची घटना घडली.

आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास असद अली यांच्या मालकीच्या इमारतीचे बांधकाम करत असताना गवंडी सोबत उर्मिला दिलीप गावित (रा.करंजीखुर्द ता.नवापूर) ही कामगार महिला काम करत होती.

अचानक दुसर्‍या मजल्यावरून पाय निसटल्याने ती खाली पडली. त्यात ती गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडली.

शेजारील महालक्ष्मी गारमेंट्स कापड दुकानाचे मालक राहुल मराठे यांनी समय सुचकता दाखवत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान सदर महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेमुळे गवंडीसोबत काम करणार्‍या कामगाराचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे दिसून आले आहे.

संबंधित ठेकेदारांकडून सुरक्षेची कोणतीही साधने पुरवली गेली नसल्याचे निदर्शनात आले असून कामगाराचा विमा उतरवणे ठेकेदाराला बंधनकारक असतांना असे काही केलेले दिसून आले नसल्याचे बोलले जात आहे

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com