रोजे धरल्यामुळे माणसाला आत्मिक बळ मिळतेेः उदेसिंग पाडवी

तळोदा येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे इफ्तार पार्टी उत्साहात
रोजे धरल्यामुळे माणसाला आत्मिक बळ मिळतेेः  उदेसिंग पाडवी

मोदलपाडा Modalpada । वार्ताहर

रमजान महिन्यामध्ये (Ramadan) गरीब कुटुंबाला (a poor family) काही दान किंवा मदत (Help) केली तर कमवलेले धन सुद्धा पवित्र होत असते. जे लोक या रमजान महिन्यामध्ये रोजे धरत असतात त्यांना मोठे आत्मिक बळ (Spiritual strength) मिळत असते आणि इथूनच पुढे आयुष्य जगण्याची स्फूर्ती देखील मिळत असते, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष (State Vice President of NCP) तथा माजी आ.उदेसिंग पाडवी (Udesingh Padvi) यांनी आयोजित इफ्तार पार्टीच्या (Iftar party) कार्यक्रमाप्रसंगी केले.

तळोदा येथे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे (Nationalist Congress) रमजान महिन्यानिमित्त इफ्तार पार्टीचे (Iftar party) आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष उदेसिंग पाडवी, पोलीस उपअधिक्षक संभाजी सावंत, तहसीलदार गिरीश वाखारे, पोलीस निरीक्षक केलसिंग पावरा, मुस्लिम समाज धर्मगुरू मौलाना शोएब रजा नूरी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष डॉ.पुंडलिक राजपूत, बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय, शहराध्यक्ष योगेश मराठे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक भरत चौधरी, केसरसिंग क्षत्रिय, युवा नेते संदीप परदेशी, मुस्लिम समाज अध्यक्ष आरीफ शेख नुरा उपस्थित होते.

उदेसिंग पाडवी पुढे म्हणाले, तळोदा शहरासारखी शांतता (peace) जिल्ह्यात कुठेही नाही. शहरातील प्रत्येक बांधव हा सर्व धर्माचा आदर (Respect for religion) करत असतो. तसेच प्रत्येक सणात हिंदू व मुस्लिम बांधव हे खांद्याला खांदा लावून सण उत्सव साजरे करत असतात. यासाठी मुस्लिम बांधवांसाठी (Muslim Brotherhood) जमातखाना बांधण्यासाठी अल्पसंख्यांक मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे 50 लाख रुपयांची मागणी केली आहे. तसा प्रस्तावदेखील त्यांना देण्यात आला आहे. ती मागणी देखील लवकरच पूर्ण होईल असा मला विश्वास आहे, असे ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक योगेश मराठे यांनी केले. यावेळी तहसीलदार गिरीश वखारे, पोलीस उपअधिक्षक संभाजी सावंत व युवा नेते संदीप परदेशी यांनीदेखील मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला जिल्हा उपाध्यक्ष रामराव वाघाडे, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष आरिफ नुरा, अल्पसंख्यांक शहराध्यक्ष आदिल शेख, राजेश पटेल, राष्ट्रवादी शहर उपाध्यक्ष बटु पाडवी, नदीम बागवान, गणेश पाडवी, अनिल पवार, युवक तालुकाध्यक्ष कमलेश पाडवी, संघटक राहुल पाडवी, मुकेश पाडवी, सोमनाथ पाडवी, कांतीलाल पाडवी, धर्मराज पवार, गणेश भामरे, कुणाल पाडवी, आदित्य इंगळे, सोनू सोनवणे, नितीन मराठे, विकास क्षत्रिय, इमरान सिकलीकर, हितेश राणे, संदीप वडी, नितिन वाघ, सरचिटणीस महेंद्र पोटे यांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.अविनाश मराठे यांनी केले. आभार पुरूषोत्तम चव्हाण यांनी मानले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com