सातपुडा दुर्गम भागातील शेतकरी वळले स्ट्रॉबेरी शेतीकडे

वालंबा परिसरात 50 पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी केली लागवड
सातपुडा दुर्गम भागातील शेतकरी वळले स्ट्रॉबेरी शेतीकडे

नंदुरबार । Nandurbar। प्रतिनिधी

सातपुडा अक्कलकुवा तालुक्यातील वालंबा (Valamba) परिसरात यंदा 50 पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी (Farmers) स्ट्रॉबेरीची (strawberry) लागवड केली आहे. विशेष म्हणजे तरुण शेतकरीही यामध्ये सहभाग घेत असून पोषक वातावरणामुळे उत्पादनही चांगले येत आहे, मात्र दुर्गम भाग असल्याने मार्केटची (market) सुविधा उपलब्ध नसल्याने कमी दराने स्ट्रॉबेरीची विक्री करावी लागत आहे. कृषी विभागाने (Department of Agriculture) स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकर्‍यांसाठी पर्यायी मार्केट उपलब्ध करण्याची मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ आणि वालंबा, दाब या थंड हवेच्या ठिकाणी जवळपास गेल्या 2007 पासून स्टोबेरी (strawberry) पीक लागवडीची सुरुवात झाली होती. यंदा तोरणमाळ येथे तीन शेतकरी तर वालंबा आणि दाब परिसरात जवळपास 50 पेक्षा जास्त शेतकर्‍यांनी स्ट्रॉबेरी पिकाची लागवड केली आहे. चवदार आणि उत्कृष्ट दर्जाच्या स्ट्रॉबेरीच्या उत्पन्नाला सुरुवात झाली आहे.

वालंबा हा परिसर डोंगर-दर्‍यांचा दुर्गम भाग असल्याने येथील शेतकर्‍यांनी मोठ्या मेहनतीने आपल्या जमिनी सपाटी करून सुरुवातीला साध्या पद्धतीने स्ट्रॉबेरी (strawberry) पिकाची लागवड करायला सुरुवात केली होती. परंतु कृषी विभागाच्या मदतीने त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत मल्चिंग पेपर व ड्रीप द्वारे पाणी देण्याची सोय उपलब्ध करून येथील शेतकर्‍यांना स्टॉबेरी शेतीसाठी मार्गदर्शन केले जात आहे.

आधुनिक तंत्रज्ञानामुळे (Modern technology) येथील शेतकर्‍यांच्या उत्पादनात वाढ होत आहे. मात्र हा परिसर दुर्गम भाग असल्याने या ठिकाणी विक्रीसाठी मार्केट (market) उपलब्ध नसल्याने शेतकर्‍यांना शंभर ते दीडशे रुपये दरामध्ये अक्कलकुवा मोलगी रस्त्यावर विक्री करावी लागते. वालंबा परिसरात स्टोबेरी शेतीसाठी पोषक वातावरण आहे.

वर्षानुवर्षे या परिसरात स्टोबेरी शेतीकडे तरुण शेतकरीही आकर्षित होत असून यंदा वालंबा गावातील संपत पाडवी, डेड्या पाडवी, दिलीप पाडवी या तरुण शेतकर्‍यांनी दोन लाखापेक्षा अधिक खर्च करून स्ट्रॉबेरी शेतीची लागवड केली आहे. मोठ्या मेहनतीने लागवड केलेल्या स्टोबेरी पिकातून चांगल्या उत्पादनाची शेतकर्‍यांना आशा आहे. गेल्या काही दिवसांपासून उत्पादन सुरू झाले आहे.

या परिसरात विक्रीसाठी मोठा मार्केट उपलब्ध नसल्याने सध्या येथील शेतकर्‍यां ( Farmers) द्वारे अक्कलकुवा मोलगी रस्त्यावर शंभर ते दीडशे रुपये किलो दराने विक्री केली जात आहे. नंदुरबार अतिदुर्गम भाग मागासलेला जिल्हा अशी ओळख असणार्‍या भागातही शासनाच्या कृषी विभागाच्या (Department of Agriculture)मार्गदर्शनातून शेतकरी स्ट्रॉबेरी शेतीची लागवड करून आपले जीवनमान सुधारण्याचा ध्यास ठेवत आहे.

दिवसेंदिवस या परिसरात तरुण शेतकरी (Farmers) स्ट्रॉबेरी शेतीकडे (strawberry farming) आकर्षित होत असून कृषी विभागाद्वारेही मल्चिंग पेपर व पाणी व्यवस्थापन साठी ड्रीप योजनेचं मार्गदर्शन करून लाभ दिला जात आहे. आता गरज आहे ती चांगल्या मार्केट व्यवस्थेची शेतकर्‍यांच्या शेतातच स्ट्रॉबेरीचे पॅकेजिंग सिस्टमने विक्री केल्यास शेतकर्‍यांना चांगला आर्थिक फायदा होणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com