नंदुरबार शहरात बाप्पाला वाजत-गाजत निरोप

19 गणेश मंडळ मुख्य मिरवणुकीत सहभागी
नंदुरबार शहरात  बाप्पाला वाजत-गाजत निरोप

नंदुरबार । Nandurbar। प्रतिनिधी

जिल्ह्यात सहाव्या दिवशी विविध मंडळांचे गणेश विसर्जन मिरवणूका (Ganesh immersion procession) जल्लोषात काढण्यात आल्या. या मिरवणूकीत विविध वाद्यांच्या तालावर नाचत गणेश भक्तांनी (Ganesh devotees) जल्लोष साजरा केला. गणेश भक्ताच्या उत्साला सर्वत्र उधाण आले होते. पोलीस प्रशासनातर्फे सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जिल्ह्यात एकूण 73 गणेश मंडळांनी (Ganesha mandals) बाप्पाला निरोप (bid farewell to Bappa) दिला.

शहरात 19 गणेश मंडळे मुख्य मिरवणुकीत

नंदुरबार जिल्ह्यात यंदा एकुन 860 मंडळांकडुन गणरायाची स्थापना करण्यात आली होती. सहाव्या दिवशी जिल्ह्यात 73 मंडळाकडुन गणरायाला निरोप देण्यात आला . शहरातील 19 व्यायाम शाळांतर्फे मिरवणूका काढण्यात आल्या. त्यात गणेश मंडळे मिरवणूकीच्या रांगेत लागलेली होती. यामध्ये विरभगतसिंग व्यायाम शाळा, श्री द्वारकाधीश गणेश मित्र मंडळ, महाराष्ट्र व्यायाम शाळा, जय भारत व्यायाम शाळा, विरभगतसिंग व्यायाम शाळा, दादा हनुमान व्यायाम शाळा.श्री.सच्चिदानंद व्यायाम शाळा, विर शैव लिंगायात व्यायाम शाळा, आदर्श व्यायाम शाळा, श्रीराम व्यायाम शाळा, वायुपुत्र व्यायाम शाळा, नवजीवन व्यायाम शाळा. संत रोहिदास व्यायाम शाळा, दिगंबर पाडवी आदिवासी व्यायाम शाळा, समर्थ रामदास व्यायाम शाळा. जय हनुमान व्यायाम शाळा, स्वराज्य व्यायाम शाळा, जय संताजी व्यायाम शाळा यांचा समावेश आहे हे मुख्य मिरवणूकीत सहभागी झाले होते. या मिरवणूकीसाठी जिल्हाभर मोठा पोलीस बंदोबस्त लाण्यात आला होता.

पोलीस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी संपूर्ण मिरवणूक मार्गाचा आढावा घेतला.शहरातील विसर्जन मिरवणूक शिस्तबद्ध काढण्यात आल्या होत्या. गणपती बाप्पा मोरया, पुढचा वर्षी लवकर अशा भक्तांनी घोषणा दिल्या.

पोलीसांचा चोख बंदोबस्त

मिरवणुकी दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेला आहे.यात 1 पोलिस अधिक्षक, एक अप्पर पोलिस अधिक्षक, सहा पोलिस उपअधिक्षक, 19 पोलिस उपनिरीक्षक, 61 सहाय्यक पोलिस निरीक्षक तथा उपनिरीक्षक, 729 पोलिस अंमलदार, 104 महिला पोलिस अंमलदार, 5 स्ट्रायकिंग फोर्स, दोन आरसीपी, दोन क्यूआरटी, एक एसआरपीएफ कंपनी तर 600 होमगार्ड असा तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.कायदा व सुव्यवस्थेच्यादृष्टीने चोख पोलिस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता.

दरम्यान माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी मित्र मंडळाच्या वतीने गणपती विसर्जन मिरवणुकीत सहभागी मंडळांच्या पदाधिकार्‍यांच्या सत्कार करण्यात आला.शहरातील गणपती मंदिर जवळ व्यायाम शाळा, गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांच्या सत्कार करण्यासाठी मंडपाची व्यवस्था करण्यात आली होती. या ठिकाणी माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते पदाधिकार्‍यांच्या शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित होते प्रभारी नगराध्यक्ष कुणाल वसावे, पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील, नगरसेवक गजेंद्र शिंपी,चेतन वळवी, माजी नगरसेवक दीपक कटारिया, उद्योजक देवेंद्र जैन, नगरसेवक प्रमोद शेवाळे, किरण चौधरी आदि उपस्थित होते

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com