विनयभंगप्रकरणी शिक्षण विस्तार अधिकार्‍याला 20 पर्यंत न्यायालयीन कोठडी

विनयभंगप्रकरणी शिक्षण विस्तार अधिकार्‍याला 20 पर्यंत न्यायालयीन कोठडी

शहादा Shahada । ता.प्र.-

शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या (Govt Secondary Ashram School) विद्यार्थी विद्यार्थिनींची (Students) सहल (trip ) घेऊन परतीच्या प्रवासात बसमध्ये रात्रीच्या वेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील (Integrated Tribal Development Project Office ) एका शिक्षण विस्तार अधिकार्‍याने (Education Extension Officer) आश्रमशाळेच्या अधिक्षिका महिलेच्या (female superintendent) विनयभंग (molestation) केल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी अधिक्षिकेच्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षण विस्तार अधिकार्‍याविरुद्ध विनयभंगाच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिक्षण विस्तार अधिकार्‍याला अटक (arrested) करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास 20 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) सुनावली आहे.

दरम्यान, सदर विस्तार अधिकार्‍यावर सहलीदरम्यान विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने शहादा पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका शासकीय माध्यमिक आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींची शैक्षणिक सहल वेरूळ (ता.दौलताबाद) येथे नेण्यात आली. शैक्षणिक सहलित इयत्ता दहावीच्या विद्यार्थी विद्यार्थिनीसह शिक्षक, शिक्षिका, अधिक्षिका असे एकूण 360 जण एसटी महामंडळाच्या सात बसेसने सहलीसाठी गेले होते.

सहलीदरम्यान आश्रमशाळेतील एक अधिक्षिका महिला व एकात्मिक आदिवासी विकास कार्यालयाचे शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र जगन्नाथ मुसळे हे एकाच बसमधून प्रवास करीत होते. सहल आटोपून परतीच्या प्रवासात रात्रीच्या वेळी दीड ते साडेतीन वाजेच्या दरम्यान एसटी बसमध्ये बसलेल्या शिक्षण विस्तार अधिकारी मुसळे यांनी अधिक्षिका महिलेल्या आपल्या शेजारी आसनावर बसवून अंगलटपणा केला.

तसेच अश्लील वर्तन करीत सदर अधीक्षिका महिलेच्या विनयभंग करण्यात आला. याबाबत पीडित आश्रमशाळेच्या अधीक्षिका महिलेने शहादा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र जगन्नाथ मुसळे यांच्याविरुद्ध भादवि कलम 354 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पाटील करीत आहेत. याप्रकरणी शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र जगन्नाथ मुसळे यास अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास 20 ऑक्टोबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com