मोड येथे आठवड्यात दुसरा बिबट्या मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ

प्राणी प्रेमींमधून होतेय हळहळ व्यक्त
मोड येथे आठवड्यात दुसरा बिबट्या मृत अवस्थेत आढळल्याने खळबळ

बोरद | वार्ताहर - NANDURBAR

मोड (Mode) येथील भगवान देवराम शिंदे यांच्या शेतात बिबट्या मृत अवस्थेत (leopard is dead) आढळून आला आहे. दरम्यान याआधीही मोड येथेच एक बिबट्या मृत आढळून आला होता आणि आज दुसरा आठवड्याभरात दोन बिबट्याचा जीव गेल्याने प्राणी प्रेमींमधून (Animal lovers) हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सविस्तर घटना अशी की, तळोदा तालुक्यातील मोड येथील भगवान देवराम शिंदे यांच्या शेतात ऊसाची तोडणी सुरु आहे. ऊस तोडणी करीत असतांना दुपारी ३ वाजेचा सुमारास ऊस तोडणी करणार्‍या मजुरांना प्रचंड दुर्गंधी येऊ लागली. मजुर त्या दिशेला गेले असता त्यांना तिथे एक बिबट्या मृत अवस्थेत दिसून आला.

मजुरांनी सदर बाब शेतमालक भगवान देवराम शिंदे रा मोड ता तळोदा यांना कळवली. शेतमालकाने लागलीच तळोदा वनविभागाशी संपर्क साधून सदर घटनेची माहिती दिली. दरम्यान परिसरात बिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्याची वार्ता गावात पसरल्याने शेतात नागरिकांनी गर्दी केली होती.

सायंकाळी उशीरा पर्यत वनविभागाचे अधिकारी अथवा कर्मचारी कोणीच शेतात पोहचले नसल्याचे कळून आले. दरम्यान काही दिवसांपूर्वी मोड येथेच एक बिबट्या मृत अवस्थेंत आढळून आला होता. बिबट्यांचा झुंजीत त्या बिबट्याचा मृत्यू झाल्याचे त्यावेळी वनविभागाने म्हटले होते.

आता पुन्हा आज एक बिबट मृत अवस्थेंत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून आता हा दुसरा बिबट्या कसा मृत झाला असावा याविषयी तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. बिबटयाचा आठ दिवसांपूर्वी मृत झाला असावा कारण परिसरात दूर्गंधी पसरली होती. बिबटयाचे मृत शरीर सर्व गळून गेले आहे. असे शेतकरी अंदाज व्यक्त करत होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com