नंदूरबारात दिसलेल्या आगीच्या गोळ्याचे साऱ्यांनाच कुतूहल

ते इलेक्ट्रॉन राॅकेट बुस्टरचेच तुकडे
नंदूरबारात दिसलेल्या आगीच्या गोळ्याचे साऱ्यांनाच कुतूहल

नंदुरबार| Nandurbar प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्यात आज दिनांक २ एप्रिल रोजी रात्री ८वाजेच्या सुमारास आकाशातून (sky) आगीचे गोळे (fireball) जाताना हजारो नागरिकांनी (citizens) पाहिले. सदर आगीचे गोळे उल्का (Meteor) असल्याचे सांगण्यात आले. परंतु याबाबत नागरिकांसह प्रशासनही (administratio) अनभिज्ञ (Ignorant) असल्याचे नेमका हा प्रकार काय होता याबाबत कुतूहल (Curiosity) निर्माण झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज दिनांक २ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास आकाशात अचानक आगीचा गोळा (fireball) जाताना दिसला. जिल्ह्यातील नंदूरबार, धानोरा, अक्कलकुवा, शहादा, नवापूर, भांग्रापानी आदी भागात हा आगीचा गोळा दिसला, काहींनी हा गोळा म्हणजे तारा तुटल्याचे (stars are broken) सांगितले, तर काहींनी विमानाला आग (plane caught fire) लागल्याचे सांगितले, काहींनी हा उल्का ((Meteor)) पात असल्याचे सांगितले.

प्रत्यक्षात हा गोळा कसला होता याबाबत नागरिकांसह प्रशासनही अनभिज्ञ होते. त्यामुळे हा काय प्रकार होता याबाबत नागरिकांमध्ये कुतूहल (Curiosity) निर्माण झाले आहे. या आगीच्या गोळ्याचे अनेकांनी मोबाईल मध्ये चित्रीकरण केले.

इलेक्ट्रॉन राॅकेट बुस्टरचेच तुकडे न्यूझीलंड येथील माहीया द्वीपकल्पावरुन भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६:११ वाजता तेथील राॅकेट लॅब कंपनीच्या इलेक्ट्रॉन राॅकेट द्वारे ब्लॅकस्काय नावाचा उपग्रह पृथ्वीच्या ४३० किमी उंचीवर नेऊन स्थिरावण्यात आला. आजच्या तारखेत केवळ एकाच राॅकेट उड्डाणाची नोंद असल्याने आज सायंकाळी उत्तर - पुर्व महाराष्ट्रात दिसलेली घटना ही या इलेक्ट्रॉन राॅकेटच्या बुस्टरचेच असावेत... आपल्या भागात साधारण तीस ते पस्तीस किमी उंचीवरून बुस्टर वातावरणाशी घर्षण झाल्याने एकामागोमाग एक असे ते जळत गेले. दिसणार्‍या घटनेचा मार्ग व प्रकाशमान याचा अंदाज घेतला तर ही कोणतीही उल्का वर्षाव किंवा उडती तबकडी सारखी घटना नाही ही निश्चीत ..

श्रीनिवास औंधकर, संचालक एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्र, औरंगाबाद

जळगाव सह नजीकच्या भागात आकाशात दिसलेली प्रकाशमान आकृती ही न्यूझीलॅण्ड ने सोडलेल्या ब्लॅकस्काय उपग्रहाच्या बूस्टर चे असावेत अशी माहिती ए पी जे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र औरंगाबाद यांनी दिली आहे. त्यामुळे कुठलीही भीती किंवा अंधश्रद्धा न बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.