सिमा तपासणी नाक्यावरुन दररोज शेकडो ओव्हर लोड गाडया आडमार्गाने होतात पास

आरटीओ अधिकारी, कर्मचारी व पंटरांकडून टोळीप्रमाणे होतेय कोटयावधींची लूटः धुळे जिल्हा ट्रक मालक असोसिएशनचा आरोप
सिमा तपासणी नाक्यावरुन दररोज शेकडो ओव्हर लोड गाडया आडमार्गाने होतात पास

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

जिल्हयातील नवापूर व गव्हाळी (Nawapur and Ghavli) येथील सीमा तपासणी (border check point) नाक्यावरुन दररोज सुमारे ५० टन ओव्हरलोड वाहने (Overloaded vehicles) चिरीमिरी घेवून लगतच्या आडमार्गाने पास (Bypass) केली जात असून यात दररोज सुमारे चाळीस ते पन्नास लाखाचा शासकीय महसूल बुडत (Government revenue is falling) असल्याचा आरोप (Accusation) करुन सीमा तपासणी नाक्यावर असलेल्या संबंधीत अधिकारी व कर्मचार्‍यांवर (concerned officers and employees) कारवाई (action) करण्यात यावी, अशी मागणी धुळे जिल्हा ट्रक मालक असोसिएशन (Dhule District Truck Owners Association), उत्तर महाराष्ट्र ट्रक ओनर्स असोसिएशन, (North Maharashtra Truck Owners Association,) संघर्ष समितीतर्फे (Sangharsh Samiti) मनोज राघवन (Manoj Raghavan) यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

याबाबत धुळे जिल्हा ट्रक मालक असोसिएशन, उत्तर महाराष्ट्र ट्रक ओनर्स असोसिएशन, संघर्ष समितीच्या पदाधिकार्‍यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत श्री.राघवन यांनी सांगितले,

महाराष्ट्र-गुजरात आंतरराज्य सीमा तपासणी नाका विशेषत: नवापूर व गव्हाळी या तपासणी नाक्यावर गुजरात राज्यातून माल भरुन येणार्‍या मालवाहतूक ट्रक्स दिवसा ढवळ्या राजरोसपणे ४० ते ५० टन ओव्हरलोड भरुन येतात.

नवापूर, गव्हाळी या आंतरराज्य तपासणी नाक्यावर या ओव्हरलोड ट्रक्स चालकांकडून ‘अर्थपूर्ण’ व्यवहार करुन सदर ट्रक्स तपासणी नाक्यावरुन राजरोसपणे पास केल्या जातात. या सर्व अर्थपूर्ण व्यवहारात तपासणी नाक्यावरील अधिकारी, कर्मचारी व त्यांचे पंटर एकमेकांच्या संगनमताने टोळी बनवून कार्य तडीस नेत आहेत.

या आंतरराज्य तपासणी नाक्यावर दररोज अंदाजे ८ ते ९ हजार मालवाहतूक ट्रक्सचा वावर असतो. यात ३० ते ४० टक्के माल वाहतूक ही ओव्हरलोड असते म्हणजेच २५०० ते ३५०० मालवाहतूक ट्रक्स या ओव्हरलोड असतात.

या ट्रक्स वर शासकीय नियमानुसार दंड आकारणी केली तर शासनाच्या तिजोरीत कोटयावधींचा महसूल जमा होणार आहे. परंतु तपासणी नाक्यावर कर्त्यव्यावर हजर असलेले अधिकारी, कर्मचारी त्यांच्या पंटरांना हाताशी धरुन आपल्या अधिकारांचा गैरवापर करुन स्वतःच्या व वरिष्ठांच्या टार्गेटपुर्तीसाठी रितसर लुट करुन शासनाच्या महसूल बुडवीत आहे.

धुळे जिल्हा व परिसरातील लहान/मोठे मालवाहतुक करणारे मालक-चालक गुजरात राज्य जवळ असल्याने व गुजरात राज्यात मालवाहतुकीसाठी बाजारपेठ मोठ्या प्रमाणात असल्याने गुजरात राज्यातून महाराष्ट्र व इतर राज्यात मालवाहतूक करीत असतात.

अशा वेळी महाराष्ट्र-गुजरात आंतरराज्य तपासणी नाक्यावर मालवाहतूक ओव्हर लोड हा इतर कागदपत्रे चेकींगच्या नावाने शासकीय नियामांची बतावणी करून ३० ते १५० किलो मालओव्हरलोड दाखवून शासकीय दंड वसुली केली जाते.

दुसरीकडे त्याच तपासणी नाक्यावर त्याचवेळी ४० ते ५० टन ओव्हरलोड असलेल्या मालवाहतूक ट्रक्स कर्त्यव्यावर हजर असलेल्या अधिकारी/कर्मचारी व त्यांच्या पंटरमार्फत एका टोळीप्रमाणे काम करुन सदर ट्रक्स चालकांसोबत अर्थपूर्ण व्यवहार करुन विशेष आशिर्वादाने ट्रक पास केला जातो.

या बाबींकडे तक्रारीकडे गांभीर्याने बघुन सदर आंतरराज्य तपासणी नाक्यावरील या कर्त्यव्यावर अधिकारी व कर्मचारी यांच्यावर योग्य ती कार्यवाही करावी, अन्यथा संघटना या विरोधात योग्यती भुमिका होईल, असा इशारा देण्यात आला आहे. याबाबत उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले आहे. यावेळी नरेंद्र शिंपी, नंदु पाटील, आसिफ पठान, प्रेम भावसार, हरिष विभ्ाुते, रविंद्र शिंदे, सुनील पाटील, महेश अहिरराव आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com