खान्देश, मराठवाडा व विदर्भातील कलावंतांच्या हातात मनोरंजनाची इंडस्ट्री-सिने अभिनेता जयवंत वाडकर

‘युवारंग’ मध्ये जळगावच्या मु.जे.महाविद्यालयाचा बोलबाला, चोपडा महाविद्यालय उपविजेते
खान्देश, मराठवाडा व विदर्भातील कलावंतांच्या हातात मनोरंजनाची इंडस्ट्री-सिने अभिनेता जयवंत वाडकर

नंदुरबार | प्रतिनिधी nandurbar

नाट्य व सिनेक्षेत्रात (Cinema) नवनवीन प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. मात्र, (pune) पुणे व (mumbai) मुंबई वगळता (Khandesh, Marathwada and Vidarbha) खान्देश, मराठवाडा व विदर्भातील कलावंताच्या हातात ही (Entertainment) मनोरंजनाची इंडस्ट्री (Industry) आहे, असे प्रतिपादन सिने अभिनेता जयवंत वाडकर (Cine actor Jaywant Wadkar) यांनी केले. दरम्यान, (Poet Bahinabai Chaudhary North Maharashtra University) कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभाग आणि पूज्य सानेगुरुजी विद्याप्रसारक मंडळाचे औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय व कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय शहादा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवक महोत्सवात जळगावच्या मुळजी जेठा महाविद्यालयाने (Mulji Jetha College) सर्वसाधारण विजेतेपद प्राप्त केले. तर कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय (chopada) चोपडाचा संघ उपविजेता ठरला.

दि.१९ ते २३ एप्रिल दरम्यान शहादा येथे झालेल्या युवक महोत्सवाचा समारोप प्रसिध्द अभिनेते जयवंत वाडकर यांच्या उपस्थितीत जल्लोषात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पू.सा.गु.वि.प्र.मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील होते.

यावेळी मंचावर आ.सुधीर तांबे, पू.सा.गु.वि.प्र.मंडळाच्या मानद सचिव श्रीमती कमलताई पाटील, प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे, कार्याध्यक्ष दीपक पाटील, व्य.प.सदस्य दिलीप पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ.किशोर पवार, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.सुनील कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

याशिवाय मंचावर जि.प.सदस्या सौ.जयश्री पाटील, व्य.प.सदस्य प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख, प्रा.मोहन पावरा, पू.सा.गु.वि.प्र.मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील, प्राचार्य डॉ.आर.एस.पाटील, प्राचार्य डॉ.एस.पी.पवार, प्राचार्य डॉ.एन.जे.पाटील, प्राचार्य बी.के.सोनी,

प्राचार्य डॉ.डी.एम.पाटील, प्राचार्य डॉ.पी.एल.पटेल, प्राचार्य डॉ.व्ही.एस.पटेल, युवारंग समन्वयक प्रा.डॉ.आय.जे.पाटील, प्रा.इंदिरा पाटील, प्रा.मकरंद पाटील, रासेयोचे संचालक डॉ.सचिन नांद्रे उपस्थित होते.

यावेळी बोलतांना जयवंत वाडकर म्हणाले की, अशा युवक महोत्सवामधून कलावंत घडत असतात. नाट्य व सिनेक्षेत्रात नवनवीन प्लॅटफॉर्म उपलब्ध असून सध्या पुणे व मुंबई वगळता खानदेश, मराठवाडा, विदर्भ येथील कलावंताच्या हातात ही मनोरंजनाची इंडस्ट्री आहे.

कारण या भागात उत्तम कलावंत घडत आहेत. खानदेशातील श्याम राजपूत व सचिन गोस्वामी यांचा त्यांनी आर्वजून उल्लेख केला. या महोत्सवातील उत्तम कलावंतांना मुंबईत मी अवश्य संधी देईल अशी ग्वाही देताना जयवंत वाडकर यांनी ज्या क्षेत्रात आपण काम करत आहोत त्या क्षेत्रात मिळणारा काही पैसा सामाजिक कामासाठी द्यावा असे आवाहन केले.

मी देखील निळू फुले, डॉ.श्रीराम लागू, चंद्रकांत गोखले यांचा आदर्श घेत काही पैसा सामाजिक कामासाठी देत असतो असे सांगीतले. मराठी तरुणांनी स्पर्धा परीक्षांमधून प्रशासनात यावे आणि त्यासाठी महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राजकारणाच्या ढासळत्या नितिमत्तेबद्दल चिंता व्यक्त करून तरुणांनी नेता निवडतांना सजग रहावे असे ते म्हणाले.

संस्थेचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी तरुणाईने सद्भाव आणि सद्गुणांचे पालन करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. आ.सुधीर तांबे यांनी देशाचे भवितव्य तरुणांच्या हातात असून त्यांनी उद्याचा भारत घडविण्यासाठी मोठे स्वप्न बघावे असे आवाहन केले.

प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.एस.टी.इंगळे यांनी या महोत्सवाला तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करून खानदेशातील तरुणाई निसर्गाला झूकवणारी आहे. त्यामुळे उन्हाची तमा न बाळगता उत्साहाने सादरीकरण केल्याचे ते म्हणाले.

युवारंगचे कार्याध्यक्ष दीपक पाटील यांनी मनोगत व्यक्त करतांना विचारांची देवाण-घेवाण या महोत्सवातून झाल्याचे सांगितले. विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सुनील कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.

१०६ महाविद्यालयातील १५७७ विद्यार्थी कलावंत व इतर साथसंगतदार आणि व्यवस्थापक मिळून २ हजार लोक या महोत्सवात सहभागी झाल्याचे त्यांनी सांगितले. तबस्सुम गौरी व सुयश ठाकूर या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

तर संघव्यवस्थापकांच्यावतीने प्रा. रुपाली चौधरी आणि प्रा.जितेंद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डॉ.विजयप्रकाश शर्मा यांनी केले. प्राचार्य आर.एस.पाटील यांनी आभार मानले. पारितोषिकांचे वाचन प्रा.राम पेटारे व प्रा.धनंजय चौधरी, डॉ.पंकजकुमार नन्नवरे यांनी केले.

युवारंग स्पर्धेचा निकाल असा

संगीत विभाग - शास्त्रीय गायन:- मु.जे.महाविद्यालय,जळगाव (प्रथम), कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (द्वितीय), कला व मानव्यशास्त्र प्रशाळा कबचौउमवि, जळगाव(तृतीय)

शास्त्रीय वादन (तालवाद्य)-मु.जे.महाविद्यालय जळगाव (प्रथम), कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय चोपडा (द्वितीय), किसान महाविद्यालय, पारोळा (तृतीय)

शास्त्रीय वादन (सुरवाद्य)- कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय चोपडा (प्रथम), मु.जे.महाविद्यालय जळगाव (द्वितीय), एस.एस.व्ही.पी.एसचे कला व वाणिज्य महाविद्यालय धुळे (तृतीय)

सुगम गायन (भारतीय)-मु.जे.महाविद्यालय जळगाव (प्रथम), कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय चोपडा (द्वितीय), प्रताप महाविद्यालय अमळनेर (तृतीय).

सुगम गायन (पाश्चिमात्य)- पी.के. कोटेचा महिला महाविद्यालय भुसावळ (प्रथम), फार्मसी महाविद्यालय शहादा (द्वितीय), जी.एच.रायसोनी इन्स्टीट्यूट ऑफ इंजिनिअरिंग ऍण्ड मॅनेजमेंट जळगाव (तृतीय)

समुह गीत (भारतीय)- कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय चोपडा (प्रथम), प्रताप महाविद्यालय अमळनेर (द्वितीय), मु.जे.महाविद्यालय,जळगाव (तृतीय)

समुह गीत (पाश्चिमात्य)- मु.जे.महाविद्यालय जळगाव (प्रथम), कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय चोपडा (द्वितीय), प्रताप महाविद्यालय अमळनेर (तृतीय)

लोकसंगीत- मु.जे.महाविद्यालय,जळगाव (प्रथम), कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (द्वितीय), प्रताप महाविद्यालय,अमळनेर (तृतीय)

भारतीय लोकगीत- पू.सा.गु.वि.प्र.मंडळाचे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शहादा (प्रथम), कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय चोपडा (द्वितीय), प्रताप महाविद्यालय अमळनेर (तृतीय)

नृत्य विभाग

समुह लोकनृत्य- मु.जे.महाविद्यालय जळगाव (प्रथम), पी.के.कोटेचा महिला महाविद्यालय, भुसावळ (द्वितीय), प्रताप महाविद्यालय अमळनेर (तृतीय)

शास्त्रीय नृत्य- मु.जे.महाविद्यालय,जळगाव (प्रथम), सामाजिकशास्त्रे प्रशाळा कबचौउमवि, जळगाव (द्वितीय), पू.सा.गु.वि.प्र.मंडळाचे कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शहादा (तृतीय)

साहित्य कला

वक्तृत्व:- एच.आर.पटेल महिला महाविद्यालय, शिरपूर (प्रथम), प्रताप महाविद्यालय,अमळनेर (द्वितीय), डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालय, धुळे (तृतीय)

वादविवाद- मु.जे.महाविद्यालय जळगाव (प्रथम), सामाजिकशास्त्रे प्रशाळा, कबचौउमवि जळगाव (द्वितीय), आर.सी. पटेल इन्स्टीट्यूट ऑफ फार्मा एज्युकेशन ऍण्ड रिसर्च शिरपूर (तृतीय)

काव्यवाचन- एस.एस.व्ही.पी.एसचे कला व वाणिज्य महाविद्यालय धुळे (प्रथम), आर.सी. पटेल इन्स्टीट्यूट ऑफ फार्मा एज्युकेशन ऍण्ड रिसर्च शिरपूर (द्वितीय), गोदावरी गणपतराव खडसे महाविद्यालय मुक्ताईनगर (तृतीय)

नाट्य कला

विडंबननाट- प्रताप महाविद्यालय, अमळनेर (प्रथम), मु.जे.महाविद्यालय, जळगाव (द्वितीय), कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (तृतीय)

मुकनाट्य- कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय चोपडा (प्रथम), मु.जे.महाविद्यालय जळगाव (द्वितीय), प्रताप महाविद्यालय अमळनेर (तृतीय)

मिमिक्री- पू.सा.गु.वि.प्र.मंडळाचे कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, शहादा (प्रथम),जी.टी.पाटील महाविद्यालय, नंदूरबार (द्वितीय),कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय,धरणगाव (तृतीय)

ललित कला

रांगोळी- मु.जे.महाविद्यालय जळगाव (प्रथम), आर.सी. पटेल इन्स्टीट्यूट ऑफ फार्मा एज्युकेशन ऍण्ड रिसर्च, शिरपूर (द्वितीय), वसंतराव नाईक महाविद्यालय,शहादा (तृतीय)

व्यंगचित्र:- कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, चोपडा (प्रथम), गरुड महाविद्यालय, शेंदुर्णी (द्वितीय), मु.जे.महाविद्यालय जळगाव (तृतीय)

कोलाज- कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय चोपडा (प्रथम), मु.जे.महाविद्यालय जळगाव (द्वितीय), एच.आर.पटेल इन्स्टीट्यूट ऑफ फार्मा एज्युकेशन ऍण्ड रिसर्च, शिरपूर (तृतीय)

क्ले मॉडेलिंग- मु.जे.महाविद्यालय जळगाव (प्रथम), बेंडाळे महिला महाविद्यालय जळगाव (द्वितीय), आर.सी.पटेल इन्स्टीट्यूट ऑफ फार्मा एज्युकेशन ऍण्ड रिसर्च, शिरपूर (तृतीय)

स्पॉट पेंटिग- किसान महाविद्यालय पारोळा (प्रथम), रासायनिकशास्त्र प्रशाळा, कबचौउ मवि,जळगाव (द्वितीय), मु.जे.महाविद्यालय, जळगाव (तृतीय)

चित्रकला- आर.सी.पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय शिरपूर (प्रथम), किसान महाविद्यालय, पारोळा (द्वितीय), पी.के.कोटेचा महिला महाविद्यालय, भुसावळ(तृतीय)

इन्स्टॉलेशन:- मु.जे.महाविद्यालय,जळगाव(प्रथम), पू.सा.गु.वि.प्र.मंडळाचे कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा (द्वितीय), गरुड महाविद्यालय, शेंदुर्णी(तृतीय)

फोटोग्राफी- प्रताप महाविद्यालय, अमळनेर (प्रथम), अण्णासाहेब देवरे कला व विज्ञान महाविद्यालय, म्हसदी (द्वितीय), एन.टी.व्ही.एस. शिक्षणशास्त्र महाविद्यालय नंदुरबार (तृतीय)

मेहंदी- बेंडाळे महिला महाविद्यालय जळगाव (प्रथम), रासायनिकशास्त्र प्रशाळा, कबचौउमवि जळगाव (द्वितीय), आर.सी.पटेल इन्स्टीट्यूट ऑफ फार्मा एज्युकेशन ऍण्ड रिसर्च शिरपूर (तृतीय)

गट निहाय विजेतेपद

संगीत गट- मु.जे.महाविद्यालय जळगाव,

नृत्य गट- मु.जे.महाविद्यालय जळगाव साहित्य कला गट- मु.जे.महाविद्यालय जळगाव

नाट्य गट - मु.जे.महाविद्यालय जळगाव, कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय चोपडा आणि प्रताप महाविद्यालय अमळनेर

ललित कला गट- मु.जे.महाविद्यालय जळगाव

सर्वसाधारण विजेतेपद - प्रथम - मु.जे.महाविद्यालय जळगाव (डॉ.जी.डी.बेंडाळे स्मृती चषक), द्वितीय - कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय चोपडा (कै.कुसुमताई मधुकरराव चौधरी स्मृती चषक)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com