
नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी
राज्यातील 92 नगरपालिका (Municipality) आणि चार नगरपंचायतींच्या (Nagar Panchayats) निवडणुका (Election announced) जाहीर झाल्या आहेत. यात नंदुरबार जिल्हयातील शहादा व धुळे जिल्हयातील शिरपूर व दोंडाईचा (Shirpur and Dondaicha) या नगरपालिकांचा समावेश आहे. दि.18 ऑगस्ट रोजी मतदान (Voting) घेण्यात येणार असून 19 ऑगस्टला मतमोजणी (Counting of votes) करण्यात येणार आहे. या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय होणार आहेत.
राज्यातील 17 जिल्ह्यांमधील तब्बल 92 नगरपालिका व 4 नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. यात नंदुरबार जिल्ह्यातील शहादा व धुळे जिल्हयातील शिरपूर व दोंडाईचा येथील नगरपालिकांचा समावेश आहे.
दि.22 ते 28 जुलैदरम्यान उमेदवारांना ऑनलाईन अर्ज दाखल करता येणार असून याच कालावधीत अर्ज स्विकारण्यात येणार आहे. 29 जुलैला अर्जांची छाननी व उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 4 ऑगस्टपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची मुदत आहे. 18 ऑगस्टला मतदान घेण्यात येणार असून दि.19 ऑगस्टला मतमोजणी करण्यात येणार आहे.