नंदुरबार जि.प.उपाध्यक्ष व दोन सभापतींची आज निवड

नंदुरबार जि.प.उपाध्यक्ष व दोन सभापतींची आज निवड
नंदुरबार जिल्हा परिषद

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमानुसार नंदुरबार जिल्हा परिषदेचे (Nandurbar Zilla Parishad) उपाध्यक्ष (Vice-Chairman) व दोन विषय समिती सभापतींचे (subject committee chairpersons) रिक्त पद भरण्यासाठी उद्या दि.25 ऑक्टोबर रोजी विशेष सभेचे आयोजन (Organizing special meetings) करण्यात आले आहे. नंदुरबार व शहादा उपसभापती निवडीत महाविकास आघाडी एकत्र आल्याचे चित्र आहे.त्यामुळे पोटनिवडणूकीनंतर आता उपाध्यक्ष व सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

नंदुरबार जि.प.तील 11 सदस्यांचे ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरुन सदस्यत्व रद्द झाले होते. यामुळे या गटातील सदस्यत्वासाठी नव्याने पोटनिवडणूक घेण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या होत्या. मात्र कोरोनामुळे सदरची निवडणूक लांबणीवर पडली. सप्टेंबर व ऑक्टोबरमध्ये सदर निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल देखील बदलले आहे. सन 2019 मध्ये जि.प. निवडणूक झाल्यानंतर त्यात भाजपा व कॉँग्रेसच्या प्रत्येकी 23 तर शिवसेनेच्या 7 व राष्ट्रवादीचे 3 सदस्य निवडून आले होते. मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर भाजपाच्या 7, कॉँग्रेस व शिवसेनेच्या प्रत्येकी 2 सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले होते.

पोटनिवडणूकीनंतर भाजपाचे 4, कॉँग्रेस व शिवसेनेचे प्रत्येकी 3 तर राष्ट्रवादीचा 1 सदस्य विजयी झाला आहे. यामुळे आता नंदुरबार जि.प.मध्ये सद्यस्थितीत कॉँग्रेस सर्वाधिक 24, भाजपा 20, शिवसेना 8 तर राष्ट्रवादी 3 असे पक्षीय बलाबल आहे. दरम्यान, आज जि.प.उपाध्यक्ष व दोन विषय समिती सभापतींच्या निवडीसाठी विशेष सभा होणार आहे. यामुळे नेमके उपाध्यक्षपदाची माळ पुन्हा एकदा अ‍ॅड.राम रघुवंशी यांच्या गळ्यात पडते की अन्य काही? तसेच विषय समिती सभापतीपदी कोणाची वर्णी लागते? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.जि.प.च्या विषय समिती सभापती पदासाठी राष्ट्रवादीतर्फे ही मागणी करण्यात आली आहे.त्यामुळे सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागुन आहे. नंदुरबार व शहादा उपसभापती निवडीत महाविकास आघाडी एकत्र आल्याचे चित्र आहे. नंदुरबार येथे कॉग्रेसच्या उमेदवाराला शिवसेनेने मतद केली.तर शहादा येथे राष्ट्रवादीच्या उमेदवाराने माघार घेतली होती.

Related Stories

No stories found.