चितवी जि.प.पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे सुनील गावित विजयी

असली पं.स.गणात कॉंग्रेसच्या सोनिया वळवी विजयी
चितवी जि.प.पोटनिवडणुकीत  राष्ट्रवादीचे सुनील गावित विजयी

नवापूर/मोलगी | श.प्र./वार्ताहर- NAVAPUR

चितवी ता.नवापूर (nabapur) येथील (zp) जिल्हा परिषद गटाच्या पाेट निवडणुकीत (Election) महाविकास आघाडीचे उमेदवार सुनिल सुरेश गावित (Sunil Suresh Gavit) हे २ हजार ३१९ मतांनी विजयी झाले असून असली ता.धडगाव येथील पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत कॉंग्रेसच्या सोनिया सिपा वळवी या ३ हजार ३४९ मतांनी विजयी झाल्या.

चितवी (ता.नवापूर) जिल्हा परिषद गटासाठी झालेल्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी ६९.७७ टक्के मतदान झाले होते. या पोट निवडणूकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार सुनील सुरेश गावीत तर अपक्ष उमेदवार रवींद्र नकट्या गावीत यांच्यात लढत झाली.

दरम्यान, आज नवापूर तहसिल कार्यालयात मतमोजणी घेण्यात आली. यात सुनिल सुरेश गावित यांना ७ हजार ६२४ मते मिळाली. तर अपक्ष उमेदवार रविंद्र नकटया गावित यांना ५ हजार ३०५ मते मिळाली. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार सुनिल गावित हे २ हजार ३१९ मतांनी विजयी झाले.

असली पं.स.गण

धडगांव तालुक्यातील असली पंचायत समिती गणाच्या पोटनिवडणुकीसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यात ६३.३१ टक्के मतदान झाले. आज धडगाव

या निवडणुकीत अपक्ष उमेदवार कल्पना मगन वसावे व कॉग्रेसच्या सोनिया सिपा वळवी यांच्यात सरळ लढत झाली. राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ऍड.के. सी. पाडवी यांच्या स्वतःच्या गावातील निवडणूक असल्याने ही निवडणूक त्यांच्यासाठी प्रतिष्ठेची होती.

या प्रतिष्ठेच्या लढतील कॉंग्रेसने बाजी मारली आहे. एकुण ६ हजार ३८९ मतांपैकी कॉंग्रेसच्या सोनिया वळवी यांना ४ हजार ६१६ मते मिळाली. तर अपक्ष उमेदवार कल्पना वसावे यांना १ हजार २६७ मते मिळाली. त्यामुळे सोनिया वळवी या ३ हजार ३४९ मतांनी विजयी झाल्या. ५०६ जणांची नोटाचा अवलंब केला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com