आठवीच्या विद्यार्थ्याने अतिदुर्गम भागासाठी सुचविला ड्रोन अ‍ॅम्बूलन्सचा पर्याय

बालविज्ञान परिषदेत प्रकल्पाचे राष्ट्रीय स्तरावर सादरीकरण
आठवीच्या विद्यार्थ्याने अतिदुर्गम भागासाठी सुचविला ड्रोन अ‍ॅम्बूलन्सचा पर्याय

नंदुरबार । Nandurbar। प्रतिनिधी

जिल्हयातील धडगाव, अक्कलकुवा तालुक्यातील काही गावांमध्ये रस्त्यांअभावी (Lack of roads) येथील रहिवाशांना अडचणींचा सामना (Facing difficulties) करावा लागतो. येथे आरोग्य सुविधा (Health facilities) वेळेवर मिळत नसल्याने बोजवारा उडतो. यामुळे बांबुलन्स, रोड अ‍ॅम्बूलन्स (Ambulance), फ्लोटींग अ‍ॅम्बूलन्स, बाईक अ‍ॅम्बूलन्स या भागात फारशा प्रभावी ठरत नसल्याने यावर नंदुरबार शहरातील प्रणव वडाळकर (Pranav Wadalkar) या आठवीच्या विद्यार्थ्याने ड्रोन अ‍ॅम्बूलन्सचा (Drone ambulance) पर्याय सुचविला आहे. सदर प्रकल्पाचे बालविज्ञान परिषदेत (Pediatrics Conference) राष्ट्रीय पातळीवर (national level) सादरीकरण (Presentation) करण्यात आले.

विद्यार्थ्यांमधील (students) वैज्ञानिक दृष्टीकोन (Scientific approach), जिज्ञासा वृत्तीला चालना मिळावी यासाठी राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेच्या (National Council of Pediatrics) माध्यमातून प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात येते.

नंदुरबार जिल्ह्यात वात्सल्य सेवा समितीच्या (Vatsalya Seva Samiti) माध्यमातून सदर परिषदेचेे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी जिल्हास्तरावर सुमारे 164 प्रकल्पांचे नोेंदणी करण्यात आली होती. त्यातील 64 प्रकल्पांचे प्रत्यक्ष सादरीकरण करण्यात आले. तर यातील 16 प्रकल्प (Project) विभाग स्तरावर निवडले गेले होते. त्यातील चार प्रकल्प राज्यस्तरावर व चौघांमधील ड्रोन अ‍ॅम्बूलन्सवरील (Drone ambulance) प्रकल्पाचे राष्ट्रीय पातळीवर सादरीकरण झाल्याची माहिती जिल्हा समन्वयक आशिष वाणी यांनी दिली. नंदुरबार येथील श्रीराम कोचिंग क्लासेसचा विद्यार्थी प्रणव आशुतोष वडाळकर (Pranav Ashutosh Wadalkar) याने मार्गदर्शक शिक्षक अविनाश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर प्रकल्पाचे सादरीकरण केल्याचे श्री.वाणी यांनी सांगितले.

मानव निर्देशांकांत (human index) नंदुरबार जिल्हा विकासाच्या बाबतीत पिछाडीवर आहे. त्यामुळे जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी आकांक्षित जिल्हा म्हणून निवड करण्यात आली आहे. असे असतांना जिल्हा निर्मितीच्या 24 वर्षानंतरही अतिदुर्गम भागातील (Extremely remote) शेकडो पाड्यांपर्यंत रस्ते (Roads) न पोहचल्याने येथील हजारो रहिवाशांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. यात प्रामुख्याने तोकड्या आरोग्य व्यवस्थेबाबत (Health facilities) नेहमीच प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. रस्त्यांअभावी या भागात अ‍ॅम्बूलन्स पोहचू शकत नाही. यामुळे अनेकदा रुग्णांचा रस्त्यातच मृत्यू होतो.

गरोदर माता, सर्पदंश झालेले रुग्णांच्या मृत्यू झाल्याच्या घटना अनेकदा घडल्या आहेत. या भागात ग्राऊंड अ‍ॅम्बूलन्स (Ambulance), सोयीची असली तरी तिच्या उपयोगितेवर मर्यादा येतात. फ्लोटींग अ‍ॅम्बूलन्स या नदी किनार्‍यालगतच्या गावांपुरत्याच मर्यादीत राहिल्या आहेत. तर आता गेल्या दीड वर्षापूर्वी बाईक अ‍ॅम्बूलन्स आल्या असल्या तरी ज्या भागात रस्तेच नाहीत तेथे बाईक अ‍ॅम्बूलन्स (Bike ambulance) जाऊ शकत नाही.

यावर सोलर पॉवर्ड ड्रोन अ‍ॅम्बूलन्सचा (Solar powered drone ambulance) पर्याय उपयोगी ठरु शकतो असे इयत्ता आठवीमधील प्रणव वडाळकर या विद्यार्थ्याने भारत सरकारद्वारे आयोजित केल्या जाणार्‍या राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेत प्रकल्प सादरीकरण केले. यामुळे सदर प्रकल्पाची गांभीर्याने दखल घेवून नेमक्या या भागात ड्रोन अ‍ॅम्बूलन्सची (Drone ambulance) उपयोगिता पडताळणी करुन त्याची अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

सोलर पॉवर्ड ड्रोन अ‍ॅम्बूलन्स

बहुपयोगी सोलर पॉवर्ड ड्रोन अ‍ॅम्बूलन्स (Solar powered drone ambulance) रुग्णांना आरोग्यसेवा गतिमान करण्यासाठीच नव्हे तर ड्रोनच्या माध्यमातून रुग्णांना औषधी पोहचविणे, ड्रोनच्या माध्यमातून पीक फवारणी, त्यात कॅमेरा असल्याने वन्य क्षेत्रातील पशूंवर लक्ष, रुग्णांना वेळेवर रुग्णालयापर्यंत पोहचविणे, पूर परिस्थिती, अतिवृष्टी आदी भागांची पाहणी तात्काळ करणे आदी ठिकाणी उपयोगी ठरु शकते.

बालविज्ञान परिषदेचे नंदुरबार जिल्हा पातळीवर वात्सल्य सेवा समिती आयोजन करते. यात विद्यार्थ्यांमधील जिज्ञासा वृत्तीला वाव मिळावा हा हेतू आहे. दरवर्षी विविध प्रकल्पांचे सादरीकरण करण्यात येते. विद्यार्थी स्थानिक पातळीवरील समस्येचा शोध घेवून त्यावर स्वत:च अभ्यास करुन उपाय सुचवत प्रकल्प सादर करतात.

-आशिष वाणी, जिल्हा समन्वयक

जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात सातत्याने रुग्णसेवा वेळेवर न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडत असल्याने नेहमीच ऐकिवात येते यामुळे यावर काय करता येईल? असा विचार मनात आल्यानंतर या भागात ड्रोन म्बूलन्सचा (Drone ambulance) पर्याय प्रभावी ठरु शकतो असे वाटले. यातून मॉडेल बनवून प्रकल्प सादर केला होता. सदर प्रकल्प राष्ट्रीय पातळीवर सादर झाला आहे.

-प्रणव वडाळकर बाल वैज्ञानिक

Related Stories

No stories found.