आठ शिक्षकांचा करण्यात आला गौरव

दुर्गम भागातील शिक्षकांच्या कार्यकतृत्वामुळे शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावला - अ‍ॅड.सीमा वळवी
आठ शिक्षकांचा करण्यात आला गौरव

नंदुरबार । Nandurbar । प्रतिनिधी

दुर्गम भागातील शिक्षकांच्या (Teacher) कार्यकतृत्वामुळे जिल्ह्यातील शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावत आहे असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा (Zilla Parishad Chairperson) अ‍ॅड.सीमा वळवी यांनी केले.येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे सहा शिक्षकांना शिक्षक दिनी जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार (Teacher Awards) वितरण (Distribution) प्रसंगी त्या बोलत होत्या.यावेळी जिल्ह्यातील 8 शिक्षकांना पुरस्कार देण्यात आला.

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे जिल्हा शिक्षक पुरस्कार वितरण समारंभ जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अ‍ॅड.सीमा वळवी तर प्रमुख अतिथी म्हणुन मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे , समाजकल्याण सभापती रतन पाडवी , कृषी सभापती गणेश पराडके , महिला बालकल्याण सभापती निर्मलाताई राऊत , नवापूर पंचायत समिती सभापती रतिलाल कोकणी , तळोदा पंचायत समिती सभापती बायजाबाई भिल , अक्कलकुवा पंचायत समिती सभापती सुरेखा वसावे तसेच डायट नंदुरबारचे अधिव्याख्याता रमेश चौधरी उपस्थित होते .

यावेळी अध्यक्षीय समारोपात मार्गदर्शन करतांना अ‍ॅड.सिमा वळवी म्हणालया की,धडगांव व अक्कलकुवा सारख्या दुर्गम भागातील शिक्षकांच्या कार्यकर्तृत्वामुळे नंदुरबार जिल्ह्याचा शैक्षणिक प्रगतीचा आलेख उंचावत असून जिल्ह्यासाठी ही समाधानाची बाब असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी यांनी सांगितले .

याप्रसंगी मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर मनोगतातून दुर्गम भागातील शिक्षकांच्या कार्याचा उदाहरणासह उल्लेख करुन शैक्षणिक प्रगती विषयी समाधान व्यक्त केले .

यावेळी जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला .

त्यात नंदुरबार तालुक्यातून जिल्हा परिषद शाळा , वरुळ चे शिक्षक दयानंद जाधव, नवापूर तालुक्यातून जिल्हा परिषद शाळा, बर्डीफळीच्या शिक्षिका सुरेखा गावीत, शहादा तालुक्यातून जिल्हा परिषद शाळा, देऊरचे शिक्षक राजाराम दशरथ पाटील, तळोदा तालुक्यातून जिल्हा परिषद शाळा,तर्‍हावदच्या शिक्षिका शितल शिंदे, अक्कलकुवा तालुक्यातून जिल्हा परिषद शाळा , उदेपूर खालचे चे शिक्षक मोगीलाल चौधरी व धडगांव तालुक्यातुन जिल्हा परिषद शाळा , काल्लेखेतपाडा चे शिक्षक लक्ष्मीपुत्र विरभद्रप्पा उप्पीन यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले . तसेच जिल्हा समितीच्या अधिकारात अक्कलकुवा तालुक्यातुन जिल्हा परिषद उर्दु शाळा क्रमांक 2 च्या शिक्षिका सुमैय्याबानो मो . इस्माईल व धडगांव तालुक्यातून जिल्हा परिषद शाळा, माथाअसलीचे शिक्षक धिरसिंग वसावे यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांनी केले. यावेळी सत्कारार्थी शिक्षकांमधून जिल्हा परिषद शिक्षिका शितल शिंदे यांनी तर शिक्षण विभागाच्या वतीने उपशिक्षणाधिकारी भानुदास रोकडे यांनी मनोगत व्यक्त केले . सुत्रसंचालन किरण दाभाडे यांनी केले तर आभार माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम यांनी मानले.

याप्रसंगी फुलांच्या रांगोळीचे रेखाटन करणार्‍या शिक्षिका निशा सोनवणे आणि रोहिणी पाटील , धरमदास गावीत , रिमोटद्वारे दिपप्रज्वलन तसेच प्रतिमापूजन उपक्रम साकारणारे शिक्षक मिलींद वडनगरे, गीत गायन सादर करणार्‍या एस . एस . मिशन हायस्कुलच्या विद्यार्थीनी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक उपशिक्षणाधिकारी डॉ . युनूस पठाण , शिक्षण विभागाचे कर्मचारी प्रशांत पवार, मयुर वाणी, आसिफ पठाण, योगेश रघुवंशी, सुनिल गिरी, मिलींद जाधव, परेश वळवी, इसरार सैय्यद यांनी परिश्रम घेतले .

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com