नंदुरबार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या आठ ट्रॅक्टर ट्रॉल्या जप्त

नंदुरबार शहर पोलीस ठाण्याची दमदार कामगिरी
नंदुरबार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या आठ ट्रॅक्टर ट्रॉल्या जप्त

नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR

नंदुरबार शहर व उपनगर पोलीस ठाणे (Police station) परिसरात ९ लाख ३० रुपये किंमतीच्या ८ ट्रॅक्टर ट्रॉल्यांची (tractor trolley) चोरी (theft) करणार्‍या आरोपीला ट्रॅक्टरसह (Accused with tractor) नंदुरबार शहर पोलीस (City Police Station)ठाण्याच्या पथकाने (squad) बेडया ठोकत मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

नंदुरबार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या आठ ट्रॅक्टर ट्रॉल्या जप्त
Visual Story : गर्लफ्रेंडचे ३५ तुकडे अन् ते १८ दिवस!

याबाबत अधिक माहिती अशी कि,तक्रारदार युवराज उत्तम प्रजापती, रा. धुळे रोड, नंदुरबार यांचे मालकीची ७० रुपये किंमतीची एक लाल रंगाची शक्तीमान कंपनीची ट्रॅक्टरची ट्रॉली (क्र.,एम.एच.-३९, एच.५५१९) व चेसीस (क्र.डीटीडी २५४/२०१०) ही ८ सप्टेंबर रोजी

नंदुरबार शहरातील जे. के. पार्क राजपुत पेट्रोलपंप जवळील सिद्धी ट्रेडर्स दुकानासमोरुन कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांच्या संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेली म्हणुन त्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे दिलेल्या तक्रारीवरुन अज्ञात आरोपी विरुध्द गुरनं. ५८२/२०२२ भादवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.

नंदुरबार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या आठ ट्रॅक्टर ट्रॉल्या जप्त
नवापूर येथे एक लाखाची दारु जप्त

सदरचा गुन्हा हा शेतकर्‍यांशी निगडीत असल्यामुळे नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील यांनी सदरचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर तसेच उपनगर पोलीस ठाणेचे सहा. पोलीस निरीक्षक दिनेश भदाणे यांना आदेशित केले.

नंदुरबार शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांना गुन्हयातील चोरीस गेलेली ट्रॉली व सदर ट्रॉली चोरणारा इसम हा जिल्हा रूग्णालय, नंदुरबार परिसरात असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचेे पोलीस उप निरीक्षक विकास गुंजाळ व गुन्हे शोध पथकाचे अंमलदार यांचे पथक तयार करुन पोलीस पथकाला त्याबाबत योग्य त्या सुचना दिल्या.

नंदुरबार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या आठ ट्रॅक्टर ट्रॉल्या जप्त
Visual Story : बॉलिवूड अभिनेत्याचं ट्वीट .. सौदी अरेबियामध्ये आफताबसारख्या…

नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचेे पोलीस पथकाने जिल्हा रुग्णालय, नंदुरबार परिसरात सापळा रचला असता संशयीत आरोपी हा ट्रॅक्टर व ट्रॉलीसह येत असतांना दिसुन आला. पोलीस पथकाने त्यास थांबविण्याचा इशारा केला असता संशयीत आरोपी हा चालत्या ट्रॅक्टरमधुन पळुन जाण्याचा प्रयत्न करु लागला.

त्यानंतर पोलीस पथकाने अत्यंत शिताफीने अरुण सुकलाल वळवी,रा. खामगांव, ता. जि. नंदुरबार याला अटक केली. त्याने ट्रॅक्टरची ट्रॉली चोरी केल्याची माहिती दिली. ट्रॉली ही ७० रुपये किंमतीची लाल रंगाची असुन नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात कायदेशीर प्रक्रिया करुन जप्त केली.

तसेच त्याच्याकडे अधिक विचारपुस करता त्याने आणखीन ७ ट्रॉल्या चोरी केल्याची माहिती दिली.सदरच्या ट्रॉल्या देखील कायदेशीर प्रक्रीया करुन जप्त केल्या अशाप्रकारे नंदुरबार शहर पोलीस ठाणे तसेच उपनगर पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हयांमध्ये ४ लाख ८० हजाराच्या एकुण ८ ट्रॅक्टरच्या ट्रॉल्या व ४ लाख ५० हजाराचे १ ट्रॅक्टर असा एकुण ९ लाख ३० हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पथकाला यश प्राप्त झाले आहे.

नंदुरबार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीला गेलेल्या आठ ट्रॅक्टर ट्रॉल्या जप्त
Visual Story : भारतातीलच  नव्हे तर आशिया खंडातील ही आहे पहिली डॉक्टर 'मिस वर्ल्ड'

सदर कारवाईत आणखीन आरोपी असण्याची शक्यता नाकारता येत नसुन आणखीन ट्रॅक्टर ट्रॉली हस्तगत होवु शकतात असे नंदुरबार जिल्हयाचे पोलीस अधीक्षक यांनी सांगीतले आहे तसेच त्याबाबत अधिक तपास सुरु आहे.

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक पी. आर. पाटील, नंदुरबार उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचेे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उप निरीक्षक विकास गुंजाळ, पोहेकॉ अतुल बिन्हाडे, पोहेकॉ जगदिश पवार, पोहेकॉ संदिप गोसावी, पोना भटु धनगर, पोना बलविंद्र ईशी, पोना स्वप्निल पगारे, पोना स्वप्निल शिरसाठ, पो. शि अनिल बडे, पो. शि. विजय नागोडे, पोशि इमान खाटीक, पोशि कल्पेश रामटेके, पोशि युवराज राठोड, पोशि योगेश जाधव, पोशि हेमंत बारी यांच्या पथकाने केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com