Photos # आठशे वर्षांची परंपरा असलेला काठी येथील दसरा पूजन उत्साहात

घोड्यांच्या शर्यतीत तीन राज्यातील 88 घोडेस्वारांचा सहभाग, हजारो नागरिकांची उपस्थिती
Photos # आठशे वर्षांची परंपरा असलेला काठी येथील दसरा पूजन उत्साहात

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

अक्कलकुवा (Akkalkuva) तालुक्यातील काठी (Kathi) येथे आठशे वर्ष जुनी (Eight hundred years old) दसरा पूजनाची (Dussehra worship) परंपरा (tradition) असून याठीकाणी झालेली घोड्यांची शर्यत (horse race) आकर्षण (attraction) ठरली . हजारो भाविकांच्या उपस्थितीत दसरा सण उत्साहात साजरा करण्यात आला.

सातपुड्यातील अक्कलकुवा तालुक्यातील काठी संस्थांनच्या राज घराण्याकडून 1246 सालापासून दसरा उत्सव साजरा करण्याची परंपरा 800 वर्षानंतर आजही काठी संस्थान राजघराणे व नागरिकांद्वारे सुरू आहे. पुर्वींच्या काळी सातपुडा पर्वतरांगांमध्ये दळणवळणाची सोय नसल्याने राजा महाराजांच्या काळात घोड्याला मोठे महत्त्व होते. दसरा सणा निमित्त घोड्याचे पूजन करण्याची मोठी परंपरा होती.

विशेषता म्हणजे दसर्‍यानिमित्त घोड्याची पूजा झाल्यानंतर परिसरात घोड्यांची शर्यत लावली जाते. आजही ही परंपरा टिकून आहे. काठी संस्थानातील नवाय खांब पूजन झाल्यानंतर राजघराण्यातील राजांच्या राजगादीची पूजा केली जाते.त्यानंतर घोड्यांच्या शर्यतीची रेस लावली जाते.

यंदा दसरा उत्सवानिमित्त पुजारी बाबांद्वारे नवाय खांब व घोड्यांची पूजा करून राजघराण्यातील अठराव्या पिढीतील सदस्य पृथ्वीसिंग पाडवी यांच्या उपस्थिीत राजगादीच्या पूजनानंतर घोड्यांच्या शर्यतीचा नारळ फोडल्यानंतर शर्यतीला सुरुवात झाली. घोड्यांच्या शर्यतीमध्ये यंदा गुजरात, मध्यप्रदेश व महाराष्ट्रातील जवळपास 88 घोडेस्वारांनी सहभाग नोंदवला होता.

काठी संस्थांनचा दसरा पूजन व घोड्यांची शर्यत पाहण्यासाठी सातपुड्यासह गुजरात मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील हजारो भाविक उपस्थित होते. सलग दुसर्‍या दिवशीही उशीरा घोड्यांची शर्यत पार पडल्यानंतर गरबा नृत्य कलाकार व विजेत्या घोडेस्वारांना बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी मोठया संख्येने ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com