नवरात्रोत्सवात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान

जिल्हाभरात आरोग्य शिबीरांचे आयोजन
नवरात्रोत्सवात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

18 वर्ष वयोगटातील सर्व महिलाना (women) मोफत आरोग्य तपासणीसाठी (free health checkup) ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ ("Mother is safe, home is safe") हे अभियान (campaign) 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोंबर 2022 या नवरात्रौत्सव (Navratri festival) कालावधीत शिबिराच्या (camp) माध्यमातून जिल्हास्तर, तालुकास्तर, ग्रामस्तरावर घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी (District Mother Child Care Officer) तथा अभियान नोडल अधिकारी डॉ.संजीव वळवी दिली.

यासंदर्भात जिल्हा परिषदेत बैठक संपन्न झाली. बैठकीस सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमितकुमार पाटील, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.सुलोचना बागुल आदी उपस्थित होते.

‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ हे अभियान यशस्वी करण्यासाठी सर्व विभागाचा सहभाग घेण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थेत वरील कालावधीत शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबीरात 18 वर्ष वयोगटातील सर्व महिला व गरोदर मातांची आरोग्य तपासणी, प्रतिबंधात्मक व उपचारात्मक आरोग्य सुविधा त्याचबरोबर सुरक्षित व सुदृढ आरोग्यासाठी आरोग्य शिक्षण, समुपदेशन आवश्यकतेनुसार संदर्भ सेवा मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानातंर्गत गर्भधारणेपूर्वी, गरोदरपणात व प्रसुतीपश्चात देण्यात येणार्‍या सेवा, स्तनदा माता, 30 वर्ष वयोगटावरील महिला यांना देण्यात येणार्‍या सेवा तसेच कुटूंबकल्याण कार्यक्रम, एन.सी.डी. स्क्रीनिंग, मानसिक आरोग्य, स्तनपान, व्यसनमुक्ती आदी व अनुषंगित कार्यक्रम त्यात कोविड लसीकरण, आयुष्यमान भारत डिजिटल हेल्थ खाते उघडणे, आरोग्य शिबीर अभियान घेण्यात असल्याची माहिती सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमितकुमार पाटील यांनी यावेळी दिली.

या अभियानात अधिकाधिक महिलांनी सहभागी होऊन हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.गोविंद चौधरी, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ.संजीव वळवी, यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com