बोरद परिसरात पावसाअभावी शेतकर्‍यांच्या पेरण्या खोळंबल्या

बोरद परिसरात पावसाअभावी शेतकर्‍यांच्या पेरण्या खोळंबल्या

मंगेश पाटील

बोरद । Borad

जून महिना संपला तरी पुरेसा पाऊस नसल्याने (Due to insufficient rainfall) पेरण्या खोळंबल्या (sowing was sown) आहेत. दोन वर्षापासून बोरद परिसरात पावसाने आपली पाठ फिरवल्याने शेतकरी हवालदिल (Farmers are heartbroken) झाला आहे. गेल्या वर्षीदेखील जून महिना लोटला तरी पावसाचं आगमन होऊ न शकल्याने पेरण्या होऊ शकल्या नव्हत्या.

परंतु मे महिन्यामध्ये शेतकर्‍यांनी ज्यांच्या शेतामध्ये पाण्याची उपलब्धता आहे, अशा ठिकाणी कापूस लागवड करून तो कापूस जगवला होता. परंतु जे शेतकरी जिरायत शेती करतात, त्यांच्या शेतामध्ये उशिराने पेरण्या झाल्या होत्या. किंबहुना एक महिना पेरण्या लांबल्याने कापसाचे म्हणावं तसं उत्पन्न मिळालं नव्हतं. ज्वारीच्या पेरण्या लांबल्याने तसेच सोयाबीनच्या पेरणा लांबल्याने उत्पन्नामध्ये मोठी तफावत जाणवली होती.

त्यामुळे शेतकर्‍यांचा साधा खर्चही निघाला नव्हता. कापसाला सुरुवातीचा भाव 7 हजार ते शेवटपर्यंत 14 हजाराच्या घरात असताना सुद्धा उत्पन्न कमी आल्याने भावामुळे थोडाफार शेतकरी तरला. परंतु तो शेतीच्या माध्यमातून पाहिजे तेवढा नफा मिळवू शकला नाही.

यावर्षीही संपूर्ण जून महिना लोटला, जुलैचा पहिला आठवडाही संपलेला आहे. तरी पावसाअभावी साधे रस्तेही ओले झाले नाहीत, अशी दयनीय अवस्था या परिसरात पहावयास मिळते आहे.

जमिनीत ओलावाच निर्माण झाला नाही तर शेतकरी पेरणी करतील कुठून, त्यामुळे शेतकरी चातकासारखी पावसाची वाट पाहताना या परिसरात दिसून येत आहे. जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपला. परंतु अद्यापही परिसरात पाऊस नसल्याने पेरणी कशी करावी हा मोठा गहन प्रश्न शेतकर्‍यांसमोर उभा येऊन ठेपला आहे.

कर्ज स्वरूपात बँकेच्या माध्यमातून तसेच सावकारांकडून घेतलेल्या कर्जाच्या आधारे बियाणे वगैरे खरेदी करून शेतकर्‍याने संपूर्ण तयारी करून ठेवलेली आहे. परंतु पावसाअभावी ते घरातच पडून आहे.

ज्यांच्या शेतामध्ये पाण्याची व्यवस्था होती त्यांनी मे महिन्याचा कापूस यावर्षीही गेल्या वर्षाप्रमाणे लावला आहे. परंतु पाऊस नसल्याने कापसाच्या पिकाला वाढ होताना जाणवत नाही. जमिनीतून कितीही पाणी दिले तरी पावसाच्या पाण्याशिवाय पिकं डौलदार दिसत नाही असा शेतकर्‍याचा अनुभव आहे. वरून दिलेल्या पाण्याने पिके वाढतील, परंतु त्यांना पाहिजे तशी फळधारणा होणार नाही आणि अनेक रोग त्याच्यावर आक्रमण करतील त्यामुळे उत्पन्नामध्ये तफावत दिसेलच असा शेतकर्‍यांचा अनुभव आहे.

गेल्यावर्षी उसाची लागवड भरपूर झाल्याने ऊस तोडणी लांबली होती. काहींची तर आतापर्यंत ऊस तोडणी चालू होती. यावर्षीही उसाचे प्रमाण जास्तच असल्याने शेतकरी विद्युत पंपाचे आधारे ऊसालाही पाणी देताना आढळून येत आहे. परंतु ऊसाचे पीक हे कुठल्याही शेतात हिरव्या स्वरूपात नजरेस पडत नाही, सर्व पिकेही करपलेल्या अवस्थेत दिसत आहेत. त्यामुळे वरच्या पावसाची नितांत गरज असल्याचं शेतकर्‍यांकडून सांगण्यात येत आहे. केळी या पिकाला पाणी देताना बागायतदार शेतकर्‍यांनी ठिबक सिंचनची सोय केली आहे. त्यामुळे काही प्रमाणात केळी लागवड केलेल्या शेतकर्‍यांना दिलासा प्राप्त आहे. परंतु जमिनीचे पाणी कमी झाल्याने त्यांनाही पाण्याच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. तेव्हा शेतकर्‍यांच्या नजरा ह्या आकाशाकडे लागून आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com