नवापूर येथे सुका गांजा जप्त

नवापूर येथे सुका गांजा जप्त

नवापूर Navapur । श.प्र.

शहरातील प्रवेशद्वाराजवळ एक इसम सुका गांजा (Dry cannabis) चोरट्या पद्धतीने विक्री (Sale)करतांना आढळल्याने त्याला अटक (Arrested) करण्यात आली आहे. त्याच्याकडून सुमारे 15 हजाराचा सुका गांजा जप्त करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहराच्या प्रवेशद्वाराजवळ शेख गब्बर शेख अरमान हा इसम चोरट्या पद्धतीने सुका गांजा विक्री करत असल्याची गुप्त माहिती पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना प्राप्त झाली होती. या माहितीच्या आधारावर पोलीस अधीक्षक पाटील यांनी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाला सदर इसमावर कारवाई करण्याचे आदेश दिले.

स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने मिळालेल्या माहितीच्या आधारावर धाड टाकत शेख गब्बर शेख अरमान या इसमाकडून दीड किलो सुका गांजा जप्त केला आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. या सुक्या गांजाची अंदाजित किंमत 15 हजार रुपये आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, हेकॉ जितेंद्र तोरवणे, जितेंद्र ठाकूर, तुषार पाटील, राजेंद्र काटके, आनंदा मराठे, दादाभाई मासुर यांच्या पथकाने केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com