मोलगीसह नुकसानग्रस्त भागाची डॉ.विजयकुमार गावीत यांनी केली पाहणी

मोलगीसह नुकसानग्रस्त भागाची डॉ.विजयकुमार गावीत यांनी केली पाहणी

मोलगी ता.अक्कलकुवा। Molgi। वार्ताहर

मोलगी (Molgi) परिसरातील अनेक गावामध्ये या वर्षी झालेली अती वृष्टीमुळे खूपच नुकसान झालेले असून शेती,नाले,पूल,रस्ते वाहून गेले आहेत त्याच पार्श्भूमीवर वडफळी येथील शासकीय आश्रम शाळेत ही जवळून वाहणार्‍या नदीचा पूर (river flood) शाळेत आल्याने शाळेतील विद्यार्थ्यांना दुसर्‍या ठिकाणी हलविण्यात आले होते. या शाळेतील विद्यार्थ्यांच्या समस्या व शाळेची परिस्थिती (damaged area) पाहण्यासाठी (inspected) हा दौरा होता. या वेळी मोलगीत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून डॉ.विजयकुमार गावीत (Dr. Vijayakumar Gavit) मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.

या दौर्‍या दरम्यान त्यांनी शासकीय आश्रम दाब,सरी,व मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारातील कुपोषित बालकांसाठी असलेल्या पोषण पुनर्वसन केंद्राला ही भेट दिली व समस्या जाळून घेतल्या.दरम्यान त्यांनी भगदरी महूफळी येथील अनेक गावांना जोडणार्‍या पुलाची पाहणी केली.

आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांनी भगदरी महूफळी येथील अनेक गावांना जोडणारा मुख्य पुल हा 24 तारखेला कोसळल्यामुळे नर्मदा काठावरील 17 गावांना होणारा संपर्क तुटला होता.या पुलाला ही भेट दिली.व परिसातील अशा स्वरूच्या असलेल्या रस्त्यांचाही आढावा त्यांच्या कडून घेण्यात आला यावेळी भगदरी गावांतील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. मा.सरपंच भगदरी करमसिंग वसावे ,चंद्रसिंग पाडवी,रामसिंग वळवी,भाजपा तालुका उपअध्यक्ष रायसिंग वसावे, शरद वसावे,रान्या डाया, डेब्रामाळ ग्रा.प.सरपंच भिमसिंग वळवी, जान्या वसावे,लताताई वसावे भिमसिंग पाडवी,उत्तम पाडवी, सतपाल पाडवी,गंगाराम वसावे,वनराज वसावे,सायसिंग तडवी,व गावकरी उपस्थित होते. रामसिंग वळवी यांनी मागील महिन्यात झालेल्या अती वृष्टिने खराब झालेल्या भगदरी ते नर्मदा,काठावरील ,कंजाला,मांडवा,डनेल,मोजापाडा,उंबिलापाडा,वेलखेडी, सांबर,बुंदेमाल,माकडकुंड,डेब्रामाळ या गावांना जोडणार्‍या रस्त्यांच्या मजबुती करणासाठी व वीजपुरठाही नियमत करण्यासाठी निवेदन दिले. सातपुड्यातील अनेक गावांना जडणार्‍या स्त्यांची हीच दुरवस्था झाली आहे आज ही पावसाळ्यात कोसळलेली दोरड व मातीचे थर तसेच आहेत.

पावसाळ्या पूर्वी झालेल्या अपूर्ण अवस्थेत असलेल्या पुलाचा कामामुळे लोकांना याचा खूपच त्रास होत आहे.अशीच परिस्थिती मोलगी ते वडफळी रस्त्याची आहे त्याकडेही वेळीच लक्ष न दिल्यास व काही दुर्दैवी घटना घडल्या त्याला प्रशासन जबाबदार असेल असे परिसरातील लोकांचे म्हणणे होते.त्यामुळे प्रशासनाने वेळीस जागे होणे अपेक्षित आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com