Photos # ना.डॉ.विजयकुमार गावितांचे नंदुरबारात भव्य स्वागत

Photos # ना.डॉ.विजयकुमार गावितांचे नंदुरबारात भव्य स्वागत

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

राज्याच्या मंत्रीमंडळात (cabinet of the state) आ.डॉ.विजयकुमार गावित (Dr. Vijayakumar Gavit) यांचा समावेश (After inclusion) झाल्यानंतर आज दि. १२ रोजी प्रथमच त्यांचे नंदुरबारात आगमन झाल्याने त्यांचे शहरात भव्य स्वागत (grand welcome to the city) करण्यात आले.

नंदुरबार जिल्ह्याचे शिल्पकार अशी ओळख असलेले डॉ. विजयकुमार गावित यांना राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री पद मिळाले. त्यानंतर मुंबईहून नंदुरबारमध्ये त्यांचे प्रथमच आगमन झाल्यानंतर शहरातील धुळे चौफुली येथे समर्थक व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले.

क्रेनच्या साह्याने गावित परिवार यांना माळ टाकून शहरात जोरदार स्वागत करत जल्लोष करण्यात आला. यावेळी धडगाव, अक्कलकुवा तसेच नवापूर या ठिकाणाहून आलेल्या आदिवासी बांधवांनी पारंपारिक वाद्य व नृत्य सादर करून त्यांचे स्वागत केले.

शहरातील प्रमुख मार्गांवरुन त्यांची खुल्या वाहनातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी त्यांच्यासोबत खा.डॉ.हीना गावित, जि.प.सदस्या डॉ.सुप्रिया गावित यांच्यासह मोठया प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी ढोलताशांचा गजर करत डीजे गजर करण्यात आला. ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात येवून त्यांच्यावर पुष्पवृष्टीही करण्यात आली.

यावेळी माजी आमदार शरद गावित, डॉ.विक्रांत मोरे, नंदुरबार तालुका अध्यक्ष दीपक पाटील, सागर तांबोळीयांच्या सह असंख्य आदिवासी बांधव कार्यकर्ते व समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

धुळे चौफुली येथुन रॅली मोठा मारुती मंदिर, मोठा मारुती मंदिर तेथुन दादा गणपती, चैतन्य चौक, जळका बाजार, सोनार खुंट, गणपती मंदिर, हुतात्मा स्मारक, दीनदयाल चौक मार्गे ना.डॉ.विजयकुमार गावित आपल्या निवासस्थानी पोहचली.

तेथे डॉ.विजयकुमार गावित यांनी मार्गदर्शन केले.यावेळी जिल्हयातील भारतीय जनता पार्टीचे जिल्हा पदाधिकारी, मोर्चा आघाडी अध्यक्ष, नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परीषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, शक्तीकेंद्र प्रमुख, बुथप्रमुख आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com