नीट पीजी प्रवेश परीक्षेत डॉ.नील शाह देशात 11 वे

नीट पीजी प्रवेश परीक्षेत डॉ.नील शाह देशात 11 वे

नंदुरबार Nandurbar। प्रतिनिधी -

नुकत्याच जाहीर झालेल्या नीट पीजी (PG entrance exam) या महत्वपूर्ण वैद्यकीय परीक्षेत अखिल भारतीय क्रमवारीत (All India rankings) नंदुरबारचे डॉ.नील जयंत शाह (PG entrance exam) यांनी 11 वे स्थान (11th place) मिळवून नंदुरबार जिल्ह्याच्या नावलौकिकात भर टाकली आहे.

नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट, पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजेच नीट पीजी ही परीक्षा एम.बी.बी.एस.या वैद्यकशास्त्राच्या पदवी अभ्यासानंतर देता येते. नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशनमार्फत पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी होणार्‍या प्रवेश परीक्षेचे नियोजन केले जाते.

नंदुरबार येथील डॉ.नील जयंत शाह हे एमबीबीएस नंतरच्या प्रशिक्षण कालावधीत तो कोवीड कोरोना रूग्ण सेवा देत होते. अशाही परिस्थितीत नीट पीजीचा अभ्यास नेटकेपणाने करीत त्यांनी अखिल भारतीय क्रमवारीत 11 स्थान मिळविले. 800 पैकी 697 एवढे गुण मिळविण्याची त्यांनी पराकाष्ठा केली. ही परीक्षा निगेटिव्ह मार्कींगची असल्याने खूप कठीण मानली जाते.

त्यांनी ग्रँट मेडिकल कॉलेज व जे.जे.हॉस्पिटल मुंबई येथून एमबीबीएस पूर्ण केले आहे. त्यांचा एम.एस. ऑर्थोपेडिक्स करून स्पाइन सर्जन होण्याचा मानस आहे. यापूर्वीही त्यांनी अनेक परीक्षांमध्ये राष्ट्रीय पातळीवर यश मिळविले आहे.

बालरोग तज्ज्ञांच्या समितीकडून घेतल्या गेलेल्या अंडरग्रॅजुएट क्वीजमध्ये ते राष्ट्रीय विजेता ठरले होते. डॉ.नील हे नंदुरबार येथील बालरोग व श्वास रोग तज्ञ डॉ.जयंत शाह यांचे सुपुत्र आहेत.

Related Stories

No stories found.