प्रकाशा येथे कार्तिक स्वामी मंदिराचे द्वार उघडले, आज दिवसभर घेता येईल दर्शन

प्रकाशा येथे कार्तिक स्वामी मंदिराचे द्वार उघडले, आज दिवसभर घेता येईल दर्शन

पुनम चव्हाण

प्रकाशा Prakasha। प्रतिनिधी

श्री.दक्षिणकाशी (Dakshinkashi) म्हणून ओळखल्या जाणार्‍या प्रकाशा येथील भाविकांचा दर्शनासाठी कार्तिक स्वामी मंदिराचेद्वार (Kartik Swami Temple) वर्षातून एकच दिवस उघडण्यात येते, या अनुषंगाने कार्तिक स्वामी मंदिराचे पौराणिक महत्व जाणून येथील सेवेकरी फक्त एक दिवस दर्शनासाठी द्वार उघडत असतात, आज दि.18 रोजी कार्तिक पौर्णिमेला दुपारी 12 वाजेच्या मुहूर्तावर मंदिरट्रस्टीचे कार्याध्यक्ष रमेश ठाकरे (Working President Ramesh Thackeray) यांचा हस्ते बंद मंदिराचे बंद कुलूप उघडण्यात आले,

या प्रसंगी पोलीस बंदोबस्त असलेले जमादार सुनील पाडवी, पोलीस वळवी, रमेश माळीच,ट्रस्ट पदाधिकारी कैलास ठाकरे, दिलीप ठाकरे,कल्पेश सोनार,पिंट्या भिल गणू भिल,अरुण मट्या भिल, राजेंद्र पांडुरंग मिस्त्री, विनोद ढाकणे, मंदिर पुजारी आदी उपस्थीत होते. दरम्यान मदिर उघडल्यानंतर भाविकांची दर्शन करिता मोठी गर्दी केली.यावेळी महिला भावीकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिति दिसून आली. दरम्यान मंदिर उघडल्यानंतर मंदिरात ट्रस्टींनी शंकर महादेव,पार्वती, कार्तिक स्वामी सह गणेशजी ची पूजा अर्चा केली. मंदिरप्रांगणात होम हवंन कुंडची मानकरी राजेंद्र मिस्त्री यांच्या हस्ते पूजा विधी करण्यात आली. यावेळी शासनाने घातलेल्या कोविड नियमांचे पालन करून यात्रेचे स्वरूप वाढू नये या अनुषंगाने भाविकांचा दर्शनाकरिता कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.भाविकांनी कार्तिक स्वामीचा मूर्तीवर फक्त मोरपीस चढवून आटोपशिर पूजा विधी करणे ,कुठलाही प्रसाद वाटप करण्यात येणार नाही असे नियोजन करण्यात आले आहे, यावेळी कार्तिक स्वामींच्या दर्शनासाठी भाविकांसाठी दि. 19 शुक्रवार रोजी पूर्ण दिवस दर्शन घेता येणार आहे.असे मंदिर सेवेकरी रमेश ठाकरे,कैलास ठाकरे, पिंट्या भिल यांनी सांगितले,

कार्तिक स्वामींचे प्रकाशा येथे प्राचीन कलात्मक पाषाणयुक्त मजबूत बांधकाम केलेले तापिनदीचा किनार्‍यावर निसर्गाच्या सानिध्यात हे मंदिर पूर्वजांनी उभारले आहे, परिसरातील हजारो भाविक वर्षातून एकदा श्रध्दाने आवर्जुन येतात,परिणामी या मंदिर परिसरात यात्रेचे स्वरूप येते,प्रकाशा ग्रामपंचायत प्रशासन, यांनी साफसफाई स्वच्छता व्यवस्था केली असुन,प्रकाशा पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com