पतंगोत्सवात नायलॉन मांजा वापर करु नका

मुख्याध्यापिका सौ.सुषमा शाह यांचे चित्रफितीतून विद्यार्थ्यांना आवाहन, ईजा पोहोचलेल्या पक्षांवर शाळेत प्रथमोपचार किट उपलब्ध
पतंगोत्सवात नायलॉन मांजा वापर करु नका

नंदुरबार | प्रतिनिधी - NANDURBAR

नायलॉन प्लास्टिक मांजामुळे मोठे दुष्परिणाम दिसू लागले असून निरागस पक्षांना हकनाक जीव गमवावा लागत आहे. ही बाब चिंताजनक असून मांजामुळे ईजा पोहचलेल्या पक्षांवर प्रथमोपचार करण्याची व्यवस्था शाळेत केली असल्याचे श्रॉफ हायस्कूलच्या (Shroff High School) मुख्याध्यापिका सौ.सुषमा शहा (Headmistress Mrs. Sushma Shah) यांनी जाहीर केले आहे. नायलॉन प्लास्टिक मांजा वापर टाळण्याचे आवाहन करत त्यांनी सुरक्षित संक्रांती साजरा करण्याचे आवाहन करणारी चित्रफित सौ.शहा यांनी विद्यार्थ्यांसाठी प्रसारित केली आहे.

पर्यावरण वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न शासन आणि शैक्षणिक संस्थांमार्फत केला जात आहे. पर्यावरणाची सुरक्षा होण्याच्या जबाबदारीतून मुख्याध्यापिका सौ.सुषमा शाह (Headmistress Mrs. Sushma Shah) यांनी पतंगोत्सवात नायलॉन मांजा घातक ठरत असल्याचे विद्यार्थ्यांवर चित्रफितीच्या माध्यमातून बिंबविले.

या प्लास्टिक दोर्‍यामुळे पक्ष्यांचा हकनाक जीव जातो. त्यांची मान, पंख व शारीरिक अवयव कापले जातात. तसेच विद्युत वाहिन्यांसोबत या प्लास्टिक दोर्‍याचे घर्षण झाले. अग्नीउपद्रव होतो व मोठ्या हानीचा सामना करावा लागत असतो. प्लास्टिक मांजाचे हे दुष्परिणाम टाळण्याचे आवाहन सौ.शहा यांनी विद्यार्थ्यांना केले आहे.

पतंग दोर्‍यामुळे ईजा पोहोचलेल्या पक्षांवर मकर संक्रांतीच्या दिवशी श्रॉफ हायस्कूलच्या (Shroff High School) कार्यालयात प्रथमोपचार करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी प्रथमोपचार किट उपलब्ध केल्याचेही त्यांनी जाहीर केले. तसेच प्राणी, पक्षांविषयी ममत्व, जिव्हाळा राखत निसर्ग पूजक सण साजरा करण्याचे आवाहन सौ.सुषमा शहा यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com