जिल्हयातील सहा मोठया ग्रामपंचायतींचे विभाजन

जिल्हयातील सहा मोठया ग्रामपंचायतींचे विभाजन

३० नव्या ग्रामपंचायती अस्तित्वात

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

जिल्हयातील सहा मोठया (Gram Panchayat) ग्रामपंचायतींचे विभाजन करण्यात आले असून त्यातून ३० नव्या ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या आहेत. यात धडगाव तालुक्यातील २८ तर नंदुरबार तालुक्यातील २ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. (Dhadgaon taluka) धडगाव तालुक्यातील मांडवी व तोरणमाळ या दोन ग्रामपंचायतींचे विभाजन होवून प्रत्येकी ८, राजबर्डी ग्रामपंचायतीचे विभाजन हाेवून ७, भुषा ग्रामपंचायतीचे विभाजन होवून ३, चिंचकाठी ग्रामपंचायतीचे विभाजन होवून २ तर नंदुरबार तालुक्यातील राकसवाडे या ग्रामपंचायतीचे विभाजन होवून २ नव्या ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या आहेत

जिल्ह्यातील दर्‍या खोर्‍यात वसलेल्या आदिवासी बांधवाचा विकास साध्य करण्यासाठी जिल्ह्यातील मोठ्या आणि दुरवरच्या ग्रामपंचयातींचे विभाजन करण्याची मागणी (shivsena) शिवसेनेच्या वतीने (Chief Minister Uddhav Thackeray) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आली होती.

अक्राणी येथे विधानसभा प्रचारावेळी आले असतांनाच शिवसैनिकांनी जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतींचे विभाजन का आवश्यक आहे, हे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणुन दिले होते.

याच अनुषंगाने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून जिल्ह्यात नव्याने अनेक ग्रामपंचायतींची निर्मीती झाली आहे. या ग्रामपंचायत विभाजनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात आणि (Rural Development Minister Hasan Mushrif) ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी विशेष प्रयत्न केले आहेत.

यात मांडवी बु या मोठ्या ग्रामपंचायतींचे विभाजन करुन याठिकाणी नव्याने ८ ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या आहेत. यात ११ गावांचा समावेश करण्यात आला आहे. तोरणमाळ ग्रामपंचायतीचे विभाजन करुन या ठिकाणी देखील नव्याने ८ ग्रामपंचायती निर्माण करण्यात आल्या आहेत. तोरणमाळ मधल्या या आठ ग्रामपंचायतीमध्ये १० गाव समाविष्ट असणार आहेत.

भुषा ग्रामपंचायतीचे विभाजन करुन याठिकाणी नव्याने तीन ग्रामपंचायतींची निर्मीत करण्यात आल्या आहेत. या तीन ग्रामपंचायतींमध्ये ९ गावांचा समावेश असणार आहे. धडगाव मधल्या चिचकाठी ग्रामपंचायतीचे विभाजन करुन चिचकाठी आणि चांदसैली अशा दोन ग्रामपंचायती निर्माण करण्यात आल्या आहेत.

राजबर्डी ग्रामपंचायतीचे विभाजन करुन नव्याने ७ ग्रामपंचायतींची निर्मीती करण्यात आली आहे. या सात ग्रामपंचायतीमध्ये १० गावांचा समावेश असणार आहे. अशा पद्धतीने आता धडगाव नव्याने २७ ग्रामपंचायतींची निर्मीती झाली आहे.

नंदुरबार तालुक्यातील राकसवाडे ग्रामपंचायतीचे विभाजन होवून आता घुली आणि राकसवाडे अशा दोन स्वतंत्र ग्रामपंचायती अस्तित्वात आल्या आहेत.

या सर्व ग्रामपंचायतींच्या विभाजनासाठी शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी ३ ते ४ महिने सातत्याने पाठपुरावा केला. यासर्व ग्राम पंचायती विभाजनप्रकरणी जि.प.सदस्य विजय पराडके, कृषी सभापती गणेश पराडके, जि.प.सदस्य शिवाजी पराडके यांनी मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांचे आभार मानले आहे.

नव्याने निर्माण झालेल्या ग्रामपंचायतीचे मुख्यालय गावातच अथवा नजीकच्या गावात असल्याने अनेक दाखले, महत्वांच्या कामांसाठी दर्‍या खोर्‍यातल्या आदिवासी बांधवांना मदत होणार असून अतिदुर्गम भागाच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामपंचयात विभाजनाचा हा महत्वपुर्ण निर्णय मैलाचा दगड ठरेल असा विश्वास शिवेसना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केला आहे.

Related Stories

No stories found.