पंचायत राज समितीची जिल्हाभरात भेट

पिंगाणे येथे समितीच्या ताफ्याला अडवून ग्रामस्थांनी वाचला समस्यांचा पाढा,तळोदा तालुक्यातील विकास कामांच्या दयनीय अवस्थेमुळे समितीची नाराजी
पंचायत राज समितीची जिल्हाभरात भेट

शहादा Śahādā। ता.प्र.-

गावात झालेल्या सगळ्याच कामांची चौकशी (Inquiry of works) करून अहवाल (Report) सादर करा. घरकुलप्रश्नी तात्काळ स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेऊन त्यात नवीन यादी तयार करा. समाज मंदिर, अंगणवाडीचे अपूर्ण काम तात्काळ पूर्ण झाले पाहिजे. स्पेशल काम म्हणून अंगणवाडीचे बांधकाम तात्काळ पूर्ण करून फोटोसह माहिती समितीला पाठवा असे आदेश पंचायत राज समितीतील (Panchayat Raj Samiti) सदस्यांनी गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे (Group Development Officer Raghavendra Ghorpade) यांना दिले. दरम्यान, शहादा दौर्‍यावर आलेल्या समितीच्या ताफ्याला पिंगाणे येथील ग्रामस्थांनी विश्रामगृहाच्या ठिकाणी अडवून समस्यांचा पाढा वाचला.

शहादा तालुक्याच्या दौर्‍यावर आलेल्या महाराष्ट्र राज्य विधान मंडळाची पंचायतराज समितीतील सदस्यांनी पिंगाणे (ता. शहादा)येथील ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते अनिल कुवर यांच्या विनंतीवरून गावाला भेट दिली. समितीने गावकर्‍यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी समिती गावात येतात गावकर्‍यांनी समितीतील सदस्यांना घेराव घालू प्रश्नांची सरबत्ती करत गावात शासकीय कामात झालेल्या भ्रष्टाचाराचा पाढाच समितीतील सदस्यांसमोर वाचला.

यावेळी गावातील 78 ग्रामस्थांच्या घरकुल योजनेतील ड यादीतील सर्वेक्षण करत असताना नाव वगळण्यात आले तसेच वंचित ठेवण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला. यावेळी समितीतील सदस्यांनी तात्काळ स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेऊन लाभार्थ्यांची यादी नवीन तयार करून वंचितांना ही सामावून घेण्याचे आदेश गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे यांना दिले. त्याचबरोबर गावात झालेल्या सगळ्यात विकास कामांची चौकशी करण्याचेही आदेश दिले. यावेळी आ.विक्रम काळे, आ.किशोर जोरगेवार, आ.डॉ.विजयकुमार गावित, आ.माधवराव पवार, आ.महादेव जानकर आदी उपस्थित होते.

पंचायत समितीचे सुशोभिकरण

पंचायत राज समितीतील सदस्यांनी शहादा येथील पंचायत समितीची पाहणी करून आढावा घेतला. यावेळी पंचायत समितीच्या आवारात सुशोभिकरण करण्यात आले होते. त्याचबरोबर सदस्यांचे स्वागत आदिवासी नृत्याने करण्यात आले.

महाराष्ट्र राज्य विधान मंडळाची पंचायत राज समिती नंदुरबार जिल्हा दौर्‍यावर आली असून आज दुसर्‍या दिवशी समितीतील सदस्य आ.विक्रम काळे, आ.किशोर जोरगेवार, आ.डॉ.विजयकुमार गावित, आ.माधवराव पवार, आ.महादेव जानकर, आ.प्रदीपकुमार जैस्वाल आदींच्या समितीने शहादा येथील पंचायत समितीला भेट देऊन विकासकामांचा आढावा घेतला. यावेळी गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे व कर्मचार्‍यांनी समितीतील सदस्यांचे स्वागत केले.

यावेळी निवृत्त झालेले व बदली करून गेलेले अधिकारी-कर्मचारी ही उपस्थित होते. सभागृहात झालेल्या बैठकीत वार्तांकनासाठी माध्यम प्रतिनिधींना परवानगी नव्हती परंतु अधिकार्‍यांची चांगलीच झाडाझडती घेतल्याचे समजते.

मोदलपाडा/सोमावल

सन 2017-18 मध्ये तळोदा पंचायत समितीमार्फत तालुक्यात झालेल्या विकास कामांचे लेखापेरीक्षणाचे मूल्यमापन करतांना तालुक्यातील आरोग्य, शिक्षण, बांधकाम, शालेय पोषण आहार या कामांसोबतच सर्वच कामांमध्ये अतिशय वाईट परिस्थिती असल्याने पंचायत राज समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली.

पंचायत राज समितीने गुरुवारी तळोदा पंचायत समितीस भेट देऊन कामांची माहिती घेतली. आरोग्य शिक्षण, बांधकाम, व शालेय पोषण आहार, अश्या सर्वच कामांमध्ये अतिशय वाईट परिस्थिती दिसून आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या समितीचे जंगी स्वागत आदिवासी संस्कृती प्रमाणे करण्यात आल्याने समितीही भारावली.

राज्य शासनाची पंचायत राज कमिटी बुधवारपासून नंदुरबार जिल्ह्यात आली आहे. या समितीतील आ. देवराव होळी यांच्या उपस्थितीत सदस्य आ.अंबादास दानवे, आ.किशोर पाटील, आ.अनिल पाटील, आ.सदाभाऊ खोत, आ.सुभाष धोटे हे सदस्य पंचायत समितीत दुपारी 11 वाजेच्या सुमारास दाखल झाले होते. त्यांचे स्वागत पंचायत समिती सभापती यशवंत ठाकरे, उपसभापती लताबाई वळवी, गटविकास अधिकारी परशुराम कोकणी, सदस्य विजय राणा, चंदन पवार, अर्जुन वळवी यांनी केले.

त्यानंतर समितीने सभागृहात जाऊन सन 2017-18 मध्ये तळोदा पंचायत समित मार्फत तालुक्यात झालेल्या विकास कामांचे लेखापेरीक्षणाचे मूल्यमापन करतांना तालुक्यातील आरोग्य, शिक्षण, बांधकाम, शालेय पोषण आहार या कामांसोबतच सर्वच कामांमध्ये अतिशय वाईट परिस्थिती असल्याने समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली. शिवाय संबंधित अधिकार्‍यांना धारेवर धरल्याची खमंग चर्चा पंचायत समितीच्या वर्तुळात सुरू होती. अडीच तास कामांचा आढावा घेतला. त्यानंतर समिती कामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी येथुन सदस्य नळगव्हान येथे रवाना झाले.

अधिकार्‍यांची टोलवाटोलवी

सदस्यांनी आपल्या यादीतील 26 प्रश्नांवर संबंधित अधिकार्‍यांना विचारणा केली असता अधिकारी समाधानकारक उत्तर देण्याऐवजी टोलवाटोलवी करत होते. यात घरकुले, आरोग्य, बांधकामे, पोषण आहार, या योजनांचा समावेश होता. अधिकार्‍यांकडून उत्तरे न मिळाल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. निधी पडून असल्याची माहिती पुढे समोर आली होती.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com