महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे जिल्हाभर आंदोलन

तळोदा येथे चुल व लाकडाची मोळी वाटप, नवापूरात केंद्र सरकारचा निषेध
महागाईच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे जिल्हाभर आंदोलन

तळोदा । Taloda। ता.प्र.

तळोदा येथे केंद्र सरकार (Central Government) च्या दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईच्या विरोधात (Against inflation) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या सूचनेनुसार स्मारक चौकात राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे (NCP Youth Congress) अनोखे आंदोलन (Movement) करण्यात आले.

यावेळी, माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष, उदेसिंग पाडवी यांचा नेतृत्वाखाली तळोदा राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे लाक्षणिक असे आगळे, वेगळे आंदोलन तळोदे येथे करण्यात आले.आंदोलनात गॅस दरवाढीचा(Gas price hike) निषेध म्हणून चुलीवर चहा बनवत महिलाना चुल सोबत लाकडाची मोळी (bundle of wood) वाटप करत महागाई विरोधात ढोल व झांजर वाजवून गाणे गात जनतेचे लक्षवेधी असे आंदोलन करण्यात आले.

या प्रसंगी आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते संदीप परदेशी, नगर परीषद बांधकाम सभापती हितेंद्र क्षत्रिय, नगरसेविका तथा उत्तर महाराष्ट्र महिला राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्षा सौ.अनिता संदीप परदेशी,तालुका अध्यक्ष डॉ पुंडलिक राजपूत,शहराध्यक्ष योगेश मराठे कृ.उ.बा.स. संचालक भरत चौधरी,जिल्हा उपाध्यक्ष डॉ रामराव आघाडे,जेष्ठ नेते केसरसिंग क्षत्रिय, राष्ट्रवादी अल्पसंख्यक सेल तालुका अध्यक्ष शेख आरीफ शेख नुरा,शहराध्यक्ष शेख आदिल शेख दिलावर, कमलेश पाडवी, तालुका उपाध्यक्ष दिपक वळवी, संदीप वळवी, शहराध्यक्ष योगेश पाडवी, देवेश मगरे, हितेश चोधरी, आदित्य इंगळे, राहुल पाडवी, नासिर शेख, नदीम बागवान, गणेश पाडवी, अनिल पवार, सुनंदा गणेश पाडवी,पूनम मराठे, गायत्री क्षत्रिय, खजिनदार धर्मराज पवार,फराज पठाण, सुदाम मोरे, विकास खाटीक, जयेश जोहरी, इमरान शिकलीकर, साबीर मिस्त्री, नितीन मराठे, प्रकाश पाडवी, सागर खैरनार आदि सह बहुसंख्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होत

नवापूर येथे आंदोलन

सध्या इंधन गँस,तेल,व भाजीपाला यांचे भाव गगनाला भिडले आहे. महागाई (Inflation) वाढल्याच्या निषेधार्थ नवापूर येथे राष्ट्रवादी युवक कॉग्रेस पक्षातर्फे गॅस व दुचाकी वाहन ठेऊन मोदी सरकारचा निषेध करण्यात आला.

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या सुचणे नुसार काल महागाईच्या विरोधात निषेध मोर्चा व निषेश आंदोलन करण्यात आले.शहरातील महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या समोर गॅस(Gas) व दुचाकी वाहन (Two wheeler) यांना पुष्पहार चढवून मोदी सरकारचा निषेध केला. महागाई मुळे सर्व सामान्य कुटुंबाचे कंबरडे मोडले आहे. जनता हेराण झाली आहे.केंद्र शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करत निषेध (protest) करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी युवक कॉग्रेस युवानेते अँड.राऊ मोरे म्हणाले की, इंधन गँस,तेल,व भाजीपापला यांचे भाव गगनाला भिडले आहे. महागाई मुळे सर्व सामान्य कुटुंबाचे कंबरडे मोडले आहे. महागाईच्या निषेधार्थ आम्ही आंदोलन करीत आहोत.

यावेळी न.पा विरोधी पक्षानेता नरेंद्र नगराळे,चर्मकार समाजाचे अध्यक्ष छोटु अहिरे,जिल्हा सरचिटणीस सनी सावरे,गोलु राजपूत,मयुर सावरे,विकी महाले,अजय जाधव, अविनाश जाधव,अर्जुन सावरे,हेमंत नगराळे,मिलिंद बागले, रेहान खाटीक, अली खाटीक, शाहरुक खाटीक, सलामन बागवान,समिर शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी पोलीस निरीकक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.का. निजाम पाडवी ,पवन राजपूत, यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com