जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

शिक्षक दिनी जिल्हा परिषदेच्या सभागृहात हाेणार पुरस्कारांचे वितरण
जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर
देशदूत न्यूज अपडेट

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) प्राथमिक शिक्षण विभागातर्फे (Department of Education) दिल्या जाणार्‍या जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी (Ideal Teacher Award) जिल्हयातील सहाही तालुक्यातून प्रत्येकी एक व जिल्हा समितीच्या अधिकारात असलेल्या दोन अशा जिल्हा परिषदेच्या आठ शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. या आदर्श शिक्षक पुरस्काराचे वितरण दि.५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनी (Teacher's Day) जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात करण्यात येणार आहे.

प्राथमिक शिक्षण विभागातर्फे दरवर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जातात. यावर्षी जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी सहा तर जिल्हा समितीच्या अधिकारात असलेल्या प्रोत्साहनपर पुरस्कारासाठी दोन शिक्षकांची निवड करण्यात आली आहे.

जिल्हा शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये दयानंतर विश्‍वंभरराव जाधव (जि.प.शाळा वरुळ ता.नंदुरबार), श्रीमती सुरेखा सेगजी गावित (जि.प.शाळा बर्डीफळी (नांदवण) ता.नवापूर), राजाराम दशरथ पाटील (जि.प.शाळा देऊर ता.शहादा), श्रीमती शितल किशोर शिंदे (जि.प.शाळा तर्‍हावद ता.तळोदा), मोगीलाल खंडू चौधरी (जि.प.उदेपूर खालचे ता.अक्कलकुवा),

लक्ष्मीपूत्र विरभद्रप्पा उप्पीन (जि.प.शाळा काल्लेखेतपाडा ता.धडगाव), तर जिल्हा समितीच्या अधिकारातील प्रोत्साहनपर पुरस्कारप्राप्त शिक्षकांमध्ये श्रीमती सुरैय्याबानो मो.इस्माईल (जि.प.शाळा उर्दू क्रमांक २ ता.अक्कलकुवा), धिरसिंग शिवण्या वसावे (जि.प.शाळा माथाअसली ता.धडगाव) यांचा समावेश आहे.

या पुरस्काराचे वितरण दि.५ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता शिक्षक दिनी जिल्हा परिषदेच्या याहामोगी सभागृहात करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.अध्यक्षा ऍड.सीमा वळवी उपस्थित राहणार आहेत.

प्रमुख अतिथी म्हणून जि.प.उपाध्यक्ष ऍड.राम रघुवंशी, सभापती रतन पाडवी, गणेश पराडके, अजित नाईक, निर्मलाबाई राऊत, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.व्ही.कदम, प्राथमिक शिक्षणाधिकारी सतिष चौधरी, डायटचे प्राचार्य जगराम भटकर, उपशिक्षणाधिकारी रविंद्र पाटील, डॉ.युनूस पठान, भानुदास रोकडे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com