नंदुरबार येथे 2 जानेवारी रोजी जिल्हास्तर युवा महोत्सव

नंदुरबार येथे 2 जानेवारी रोजी जिल्हास्तर युवा महोत्सव
USER

नंदुरबार | प्रतिनिधी - NANDURBAR

जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2022-2023 मध्ये लोकनृत्यासाठी (20 कलाकार) व लोकगितासाठी (10 कलाकार) या दोन प्रकारात हा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.

महोत्सवांत सहभागासाठी कलाकार, सहकलाकार, साथसंगत देणाऱ्याचे वय 12 जानेवारी 2023 पर्यंत 15 वर्ष पुर्ण असावे. तर 29 वर्षांपर्यंन्त कलाकारासाठी 12 जानेवारी 2008 ते 12 जानेवारी 1994 नंतरचा जन्म असणे आवश्यक आहे. युवा महोत्सवात सिंथेसाईझार आदी प्रकारामध्ये इलेक्ट्रॉनिक्स वाद्य वापरण्यास तसेच लोकनृत्यासाठी टेप, सीडी, पेनड्रॉईव्ह आदी साहित्य वापरण्यास परवानगी नाही.

नंदुरबार जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक, महाविद्यालय तसेच कला व क्रीडा मंडळातील अधिकधिक इच्छुक कलावंतानी युवा महोत्सवामध्ये भाग घेण्यासाठी 30 डिसेंबर 2022 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहितीसाठी क्रीडा अधिकारी आत्माराम बोथीकर 8669168483 यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती पाटील (District Sports Officer Mrs. Patil) यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com