
नंदुरबार | प्रतिनिधी NANDURBAR
जिल्ह्यातील प्रत्येक बँक शाखेच्या (bank branch) व्यवस्थापकांनी (manager) खरीप पीक कर्ज (kharif crop loan) वाटपाचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी मनीषा खत्री (Collector Manisha Khatri) यांनी दिले. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत फक्त २६.५२ टक्के कर्ज वाटप झाले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या बैठकीत (Coordinating Committee Meetings) त्या बोलत होत्या. बैठकीला स्टेट बँक इंडियाचे क्षेत्रिय प्रबंधक सुरजितकुमार सहा, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक जयंत देशपांडे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापकीय संचालक प्रमोद पाटील, जिल्हा सहकार उपनिबंधक भारती ठाकूर आदी उपस्थित होते.
श्रीमती खत्री (Collector Manisha Khatri)म्हणाल्या की, खरीप हंगाम २०२२ साठी जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकर्यांना खरीप पीक कर्ज (kharif crop loan) उपलब्ध करुन देवून १०० टक्के खरीप कर्ज वाटप होईल याकडे बँकेने विशेष प्रयत्न करावे. यासाठी बँकेने अधिकाधिक पीक कर्जाचे मेळावे घ्यावेत.
अधिकाधिक वनपट्टेधारकांना पीक कर्जाचे वाटप करावेत. महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ देण्यासाठी आधार प्रमाणिकरण राहीलेल्या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणिकरणाचे काम त्वरीत पुर्ण करावे.
दुर्गम भागातील धडगाव, अक्कलकुवा आणि मोलगी भागात बँक सेवा (Banking services) देण्यासाठी प्रयत्न करावे. या भागातील बॅकेस येणार्या वीज व इंटरनेटची समस्या सोडविल्या जातील. बँकांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना, पीएम किसान योजना, मुद्रा योजनेचा लाभ लाभार्थ्यांना द्यावा.
बँकेच्या दर्शनी भागावर कर्ज प्रक्रियांची माहिती प्रदर्शित करावी. जयंत देशपाडे म्हणाले की, खरीप हंगामासाठी जिल्ह्यास ६०३ कोटी ४१ लाख रुपयाचे उद्दीष्ट देण्यात आले असून आज पर्यंत १६० कोटी ४ लाख रुपयाचे पीक कर्जांचे वाटप करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.
यंदा नंदुरबार जिल्ह्यात आतापर्यंत फक्त २६.५२ टक्के कर्ज वाटप झाले आहे.या बैठकीला विविध बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.