नंदुरबार येथे रोटरी क्लबतर्फे फराळ वाटप

नंदुरबार येथे रोटरी क्लबतर्फे फराळ वाटप

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

दीपावली (Diwali) म्हटली की लहानांपासून मोठ्यांपर्यंत तसेच गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत सगळेजण आपापल्या परीने दीपावली उत्सव साजरा (Celebrate) करीत असतात दीपावली निमित्त आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या गोरगरीब व्यक्तींसाठी (Poor people) दिवाळीचा गोडवा निर्माण व्हावा म्हणून रोटरी क्लब ऑफ नंदनगरी (Rotary Club of Nandanagari) तर्फे आगळावेगळा उपक्रम राबवून मानवताकी दिवाळी (Humanitarian Diwali) साजरी केली.

रोटरी क्लब ऑफ नंदनगरी तर्फे गोसावी नगर येथे मानवतेची दिवाळी साजरा करणार नंदुरबार रोटरी क्लब ऑफ नंदनगरी मार्फत विविध प्रकारचे सामाजिक जनहिताचे कार्यक्रम घेतले जातात त्याचाच एक भाग म्हणून गोरगरिबांचा सोबत दिवाळीसारख्या महत्वपूर्ण सण साजरा करण्याच्या येतो ने रोटरी क्लब ऑफ नंदनगरी तर्फे नवापूर चौफुली वरील गोसावी नगर येथे मानवतेची दिवाळी साजरा करण्यात आली.

वस्तीतील गोरगरिबांना दिवाळीच्या फराळ मिठाई पण ती वाती रांगोळी फटाके कपडे व भांडी याप्रमाणे एकत्र कीट बनवून शंभर कुटुंबांना देऊन त्यांच्या चेहर्‍यावर आनंद फुलवण्यात आला. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून वाहतूक शाखेचे पो. नि. राजेंद्र भावसार तसेच शिक्षणाधिकारी राहुल चौधरी, पीएसआय दिलीप गांगुर्डे, रोटरी क्लब चे मार्गदर्शक विशाल चौधरी, रोटरी लायन एस च्या माध्यमातून सेवा देत असलेल्या डॉ. तेजल चौधरी हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी फक्रुद्दीन जलगोनवाला, दिनेश साळुंखे, किरण दाभाडे,सुशील गवळी, विकास तोषनीवाल, राहुल पाटील सचिव अनिल शर्मा व मनोज गायकवाड गोसावी समाजाचे जेष्ठ नागरिक घरमासिंग गोसावी, रोहिदास गोसावी शेखर बंडू गोसावी हे उपस्थित होते.

रोटरी क्लब नंदनगरी चे अध्यक्ष मनोज गायकवाड यांनी आपल्या प्रास्ताविकातून रोटरी मानवतेची दिवाळी गरीबांमध्ये जाऊन कशी कशी साजरी करतात याची माहिती दिली.

सूत्रसंचालन किरण दाभाडे यांनी केले तसेच रोटरी चे सचिव अनिल शर्मा यांनी आभार प्रदर्शन केले व कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com