अमृत आहार योजनेबाबत नाराजी

तळोदा येथे विभागस्तरीय गाभा समितीची बैठक
अमृत आहार योजनेबाबत नाराजी

मोदलपाडा | वार्ताहर MODALPADA

तळोदा येथील आदिवासी प्रकल्प कार्यालयात (Tribal Project Office) आज विभागस्तरीय गाभा समितीची बैठक (Departmental Core Committee) घेण्यात आली. यावेळी अंगणवाड्यांमधील (courtyards) अमृत आहार योजनेबाबत (Regarding Amrit Ahar Yojana) प्रतिनिधींनी तीव्र नाराजी (displeasure) व्यक्त करून हा आहार सुरळीत देण्याची मागणी केली. दरम्यान, आता निधी उपलब्ध झाला असून या महिन्याचा एक तारखेपासून आहार दिला जात असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात शुक्रवारी विभागस्तरीय गाभा समितीची बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी प्रकल्प अधिकारी मंदार पत्की होते. यावेळी सचिव डॉ.महेंद्र चव्हाण, तहसीलदार गिरीश वाखारे, गटविकास अधिकारी परशूराम कोकणी, गट विकास अधिकारी चंद्रभान गोसावी, गट विकास अधिकारी एम.जी.पोतदार, डॉ.कांतीलाल टाटीया, लतिका राजपूत आदी उपस्थित होते. सुरुवातीस विभागनिहाय आढावा घेण्यात आला. त्यानंतर आरोग्य व महिला, बाल कल्याण विभागाचा आढावा घेण्यात आला.

नेहमीप्रमाणेच या दोन्ही विभागाच्या कामकाजाबाबत स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत.गेल्या तीन महिन्यांपासून शहादा, तळोदा, अक्कलकुवा,धडगाव तालुक्यातील अंगणवाड्या मधील बालकांना देण्यात येणार अमृत आहार आजतागायात दिला गेला नसल्याचे लतिका राजपूत, डॉ.कांतीलाल टाटीया यांनी निदर्शनास आणून दिले. तब्बल तीन महिन्यांपासून अंडी बंद असेल तर कुपोषणावर कशी मात करणार असा संतप्त सवाल देखील उपस्थित केला होता. त्यावेळी या विभागाचा अधिकार्‍यांनी निधी नसल्याचे स्पष्टीकरण देत आता निधी आला असून या महिन्याचा एक तारखेपासून सुरळीत दिला जात आहे. त्याचबरोबर सॅम व माम श्रेणीतील बालकांच्या श्रेणीबाबत केवळ आकड्यांचा खेळ न करता वस्तुस्थिती मांडावी. शिवाय आरोग्य विभाग व महिला, बाल कल्याण विभाग यांनी समन्वय ठेवण्याची मागणी या प्रतिनिधींनी केली.

अमृत आहार योजनेबाबत नाराजी
Visual Story : ड्रिम गर्लने दिल्या तीच्या आयुष्यातील प्रेमाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

समितीचे अध्यक्ष मंदार पत्की यांनी बैठकीत उपस्थित केलेल्या सर्व मुद्यांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना अधिकार्‍यांना दिल्या. यावेळी नायब तहसीलदार पी.एम. पानपाटील, सोमनाथ पवार, तिरूपती पाटील, सागर पवार, राहुल गिरासे, बी.एस.पवार, एस.व्ही.मराठे, नरेंद्र महाले, डॉ.गोविंद शेलते, प्रकाश ठाकरे, एस.के.भावसार, एस.बी.पाडवी आदींसह विभागप्रमुख उपस्थित होते.

अमृत आहार योजनेबाबत नाराजी
VISUAL Story: अभिनेत्री मृणाल ठाकूरचा बॉसी अवतार पाहाल तर प्रेमातच पडाल !

सोलर सिस्टीमची दुुरुस्ती व्हावी

सोलर सिस्टीमची पाणी पुरवठा योजनेची देखभाल दुरुस्ती व्हावी. ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजनेसाठी शासनाने सोलर सिस्टीम कार्यान्वित केली असली तरी या सिस्टिमचा देखभाल दुरुस्तीचा प्रश्न निर्माण होते. कारण यामुळे धडगाव,अक्कलकुवा तालुक्यातील अनेक गावांचा पाणी पुरवठा ठप्प झाल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे गावागावात योजनेचा व ठेकेदाराचा नावाचा बोर्ड लावावा जेणेकरून तातडीने दुरुस्तीसाठी गावकरी संपर्क करतील. यावर कार्यवाही करण्याची सूचना सबंधित अधिकार्‍यांना देण्यात आली.

दरम्यान, इतरही अनेक प्रश्नाबाबत संस्थांच्या प्रतिनिधींनी प्रश्न उपस्थित करत मार्गी लावण्याची सूचना केली. त्यावर मंदार पत्की यांनी सबंधित विभागप्रमुख यांनी कार्यवाही करून पुढील बैठकीस तसा अहवाल सादर करण्याचे सूचित केले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com