ऊसाला भाव नसल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी

ऊसाला भाव नसल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी

चिनोदा Chinoda ता.तळोदा । वार्ताहर

तळोदा तालुक्यातील चिनोदासह परिसरात ऊस (sugarcane) पिकाची मोठ्या प्रमाणावर लागवड (Planting) करण्यात आली आहे. मात्र खांडसरी तसेच कारखाने यांच्याकडून ऊसाला योग्य भाव (rate) मिळत नसल्याने ऊस उत्पादक शेतकर्‍यांकडून (productive farmers) संतप्त प्रतिक्रिया (Angry reaction) व्यक्त केली जात आहे.

चिनोदासह परिसरात ऊसाची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. ऊस पिक हे बारमाही असून या पिकाला मोठ्या प्रमाणात खत, ऊसाचे महागडे ब्याने, लागवडीचा खर्च, निंदणी, ठिंबक सिंचन आदी खर्च येत असतो. पपई तसेच केळीला तोड म्हणून अनेक शेतकर्‍यांनी ऊसालाच अधिक प्राधान्य दिले होते. मात्र खांडसरी व कारखाने यांच्याकडून ऊसाला रास्त भाव न दिल्याने ऊस उत्पादक शेतकर्‍यांचा हिरमोड झाल्याची भावना ऊस उत्पादक शेतकर्‍यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

सर्वच क्षेत्रामध्ये महागाई वाढलेली या महागाईचा शेतकर्‍यांना सुध्दा मोठा फटका सहन करावा लागत असून त्यातच लहरी हवामान, अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला असून त्यात आणखी शेतकर्‍यांनी पिकवलेल्या पिकास योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी पूर्णपणे भरडला जात आहे. मात्र तरी देखील शेतकरी न खचता मोठ्या आशेने जोमाने शेतात राबत आहे.

चिनोदासह परिसरात अनेक शेतकर्‍यांनी पपई व केळीला पर्याय म्हणून मोठ्या प्रमाणावर ऊसाची लागवड केली आहे. तसेच या सर्व लागवडीला मोठा खर्चही येत असतो. परंतु आता खांडसरी व कारखाने यांच्याकडून शेतकर्यांची पिळवणूक करण्यात येत असल्याने शेतकर्‍यांना आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे खांडसरी व कारखाने यांनी ऊसाला अडीच ते तीन हजार रूपये भाव द्यावा अशी अपेक्षा चिनोदासह परिसरातील ऊस उत्पादक शेतकर्‍यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com