Photos # मोदलपाड्याच्या नवागत आदिवासी तरुण मुलांचे गेर दिंडन नृत्य पाहीले का?

२५ मार्चला शिर्वे येथे आयोजन तर २६ मार्चला बुधावल येथे समारोप
Photos # मोदलपाड्याच्या नवागत आदिवासी तरुण मुलांचे गेर दिंडन नृत्य पाहीले का?

मोदलपाडा, ता.तळोदा | वार्ताहर - MODALPADA

मोदलपाडा येथे गुरुवारी दिंडन नृत्य (Ger Dindan dance) आयोजित करण्यात आले होते. या नृत्यात ५५८ नवागत आदिवासी तरुण (Newcomer tribal youth) मुलांनी सहभागी होवून गेर धरला होता. ढोल, बासरी व घुंगराच्या गजरात संपूर्ण परिसर दुमदुमला होता. हे दिंडन नृत्य पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात आदिवासी बंधू,भगिनी उपस्थित होते.

दरम्यान, उद्या दि.२५ रोजी शिर्वे येथे सदर दिंडन नृत्याचे (Ger Dindan dance) आयोजन करण्यात आले असून दि.२६ रोजी तळोदा तालुक्यातील बुधावल येथे या नृत्याचा समारोप होणार आहे.

होळी सणाच्या पार्श्वभूमीवर आदिवासींमध्ये दिंडन गेर नृत्याची (Ger Dindan dance) परंपरा १९५१ सालापासून सुरू आहे. यंदाही या दिंडन गेर नृत्याची सुरुवात अक्कलकुवा तालुक्यातील सोजदान येथून झाली होती.

तब्बल १८ दिवस चालणार्‍या या दिंडन नृत्याचे (Ger Dindan dance)आयोजन मोदलपाडा येथे गुरुवारी दुपारी करण्यात आले होते. सदर नृत्यात ५५८ नवागत तरुण मुले (new tribal youth) सहभागी होवून त्यांनी गेर धरला होता. त्यांनी पातळचा घागरा, घळ्यात चांदीचे दागिने, हातात टिपरे असा आकर्षक पेहराव करून ढोल, बासरी व मोठमोठ्या घुंगराचा गजरात अतिशय शिस्तबद्धपणे गेर धरला होता.

या तरुणांना सुरुवातीस संयोजकांनी प्रशिक्षण (Training) दिले होते. त्यामुळे ते तालबद्धपणे नाचतानाचे चित्र पाहून पाहणार्‍यांच्या डोळ्याचे पारणे फिटल्याची भावना उपस्थितांनी बोलून दाखवली. या दिंडन नृत्यातील ढोल, बासरी, घुंगराच्या आवाजाने मोदलपाडा परिसर अक्षरशः दुमदुमून गेला.

गावानजीक असलेल्या दोन एकर क्षेत्रावर या दिंडन गेर नृत्याचे (Ger Dindan dance) आयोजन करण्यात आले होते. हे नृत्य पाहण्यासाठी तळोदा, अक्कलकुवा तालुक्यातील आदिवासी बंधू, भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी माजी मंत्री अँड.पदमाकर वळवी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ऍड. सीमा वळवी, जि.प.उपाध्यक्ष ऍड.राम रघुवंशी, सभापती रतन पाडवी, सभापती अजित नाईक, माजी उपाध्यक्ष सुहास नाईक, नगरसेवक दीपक दीघे, नगरसेवक गौरव वाणी, माजी सभापती सी.के.पाडवी, जि.प.सदस्य सुभाष पटले, सुरेंद्र नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अतिरीक्त मुख्यकार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

२६ रोजी तळोदा तालुक्यातील बुधावल येथे होणार समारोप

धुलीवंदनच्या दुसर्‍या दिवसापासून सातपुड्यातील सोजदान (Sojdan) येथे सुरू झालेल्या या दिंडन गेर नृत्याचा २६ मार्च रोजी तळोदा तालुक्यातील बुधावल येथे समारोप होणार आहे. शनिवारी बुधावल येथे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी शिर्वे येथे आहे. बुधावल येथून सांगता (Concludes) केल्यानंतर सोजदान येथेच हे दिंडन नृत्याधारक पूजा, अर्चा केल्यावर आपआपल्या गावी घरी जातात.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com