नंदुरबारात आज धम्म परिषदेचे आयोजन

10 हजार समाजबांधव घेणार दीक्षा!
नंदुरबारात आज धम्म परिषदेचे आयोजन

नंदुरबार । Nandurbar। प्रतिनिधी

दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या (Indian Buddhist Congress) विद्यमाने दि. 26 डिसेंबर 2021 रोजी सकाळी 11 वाजता नंदुरबार येथे बौद्ध धम्म परिषद (Buddhist Dhamma Council) आयोजित करण्यात आली आहे. या बौद्ध धम्म परिषदेत दहा हजार जणांना दीक्षा (Initiation) दिली जाणार आहे, अशी माहिती भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष सुनील रामोशी (District President Sunil Ramoshi) यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्री.रामोशी म्हणाले, नंदुरबार शहरातील नेहरू पुतळ्याजवळ तालुका पोलिस कवायत मैदानावर बौद्ध धम्म परिषद होणार आहे. यावेळी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत. नंदुरबार जिल्हा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने प्रत्येक तालुक्याच्या ग्रामीण भागात कोपरा सभा घेण्यात आल्या.

100 हून अधिक संख्येने झालेल्या या सभांना चांगला प्रतिसाद मिळाला व 10 हजार 700 जणांनी बौद्ध धर्म दीक्षा स्वीकारण्यासाठी नोंदणी केली. त्या सर्वांना बौद्ध धर्माचे प्रमाणपत्र बौद्ध महासभेकडून ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहे. तथापि प्रत्यक्ष हाती प्रमाणपत्र देऊन दीक्षा देण्याचा समारंभ राजरत्न आंबेडकर यांच्या हस्ते नंदुरबार येथील परिषदेत पार पडणार आहे. बौद्ध धर्म स्वीकारणार्‍या या दहा हजार लोकांमध्ये विविध समाजातून आलेल्या समाज बांधवांचा देखील समावेश आहे, असेही ते म्हणाले.

Related Stories

No stories found.