शिवालयांमध्ये यंदा भक्तांची मांदीयाळी

शिवालयांमध्ये यंदा भक्तांची मांदीयाळी

नंदुरबार । Nandurbar । प्रतिनिधी

कोरोनामुळे मागील वर्षी शिवमंदिर (Shiva Temple) सामसुन दिसत होते. यंदा मात्र हर महादेवचा (Har Mahadev) गजर करत जिल्हाभरात महाशिवरात्रीनिमित्त (Mahashivaratri) शिवालय आकर्षक पुष्पगुच्छांनी सजविण्यात आले होते. दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल दिसून आली.

नंदुरबार येथे महाशिवरात्रीनिमित्त (Mahashivaratri) शहरातील डुबकेश्वर महादेव मंदिर, कामनाथ महादेव मंदिर,(Shiva Temple) उमापती महादेव मंदिर, कल्याण महादेव मंदिर, दंडपाणेश्वर महादेव मंदिर, गजानन महाराज महादेव मंदिर, काळानंदी महादेव मंदिर, कामनाथ महादेव मंदिर गणपती मंदिर, संतोषी माता महादेव मंदिर येथे दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांनी गर्दी केली होती.

शहरातील विविध मंदिरामध्ये (Shiva Temple) सकाळी अभिषेक करण्यात आला. त्यासोबत किर्तन, भजन व रामधूनचे आयोजन करण्यात आले होते. विविध मंदिरांवर रंगरंगोटी व आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. शहरातील डुबकेश्वर महादेव मंदिरात सकाळी 5.30 वाजता रूद्राभिषेक करण्यात आला. दिवसभर मंदिरांवर ध्वनिक्षेपकावरून महादेव भजन व गाणी वाजविली जात होती. त्यामुळे परिसरात भक्तीमय वातावरण होते.

बारा ज्योतिर्लिंग दर्शन

महाशिवरात्रि आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय (Prajapita Brahmakumari Ishwariya Vishwavidyalaya) माउंट आबू (राजस्थान) संचलितं नदुरबार येथील यश सचिन चौधरी या विद्यार्थ्याने महाशिवरात्रीनिमित्त शंकर भोलेनाथची वेशभूषा सादर करून डूबकेश्वर मंदिरावर भाविकांचे लक्ष वेधले

नंदुरबार शाखेतर्फे भव्य बारा ज्योतिर्लिंग (Twelve Jyotirlingas) देखावा उभारण्यात आला असून दर्शनासाठी भाविकांची गर्दी उसळली आहे.शहरातील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयतर्फे महाशिवरात्रीनिमित्त बारा ज्योतिर्लिंग देखाव्याचे उद्घाटन माजी नगरसेवक, मोहन खानवाणी व कमल ठाकूर यांच्या हस्ते झाले .

दरम्यान मंगळवारी महाशिवरात्रीनिमित्त खा. डॉ. हिना गावित (Dr. Hina Gavit) यांच्या हस्ते ओम शांती परिवाराचे प्रतीक शिव ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी माजी नगरसेवक मोहन खानवाणी, रेश्मा खानवाणी, कमल ठाकूर, शंकर तलरेजा, केंद्रप्रमुख विजया दीदी, उपस्थित होत्या.

याप्रसंगी ब्रह्मकुमारी योगिता दीदी यांनी प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयतर्फे आयोजित महाशिवरात्री (Mahashivaratri) उत्सवाचे विवेचन केले. सिंधी कॉलनी परिसरातील गुरूनानक मंगल कार्यालय सभागृहात दि.2 मार्च पर्यंत सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत बारा ज्योतिर्लिंग दर्शन देखावा भाविकांना पाहण्यासाठी खुला राहणार आहे. तसेच बुधवार दिनांक 2 मार्च रोजी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या साधकातर्फे भव्य

रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रक्तदान शिबिरासह (Blood donation camp) विविध रोग निदान तपासणी देखील करण्यात येणार आहे. परमपिता परमात्मा शिव यांचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी बारा ज्योतिर्लिंग देखावा पाहण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय आणि ओम शांती परिवारातर्फे करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com