शेतकर्‍यांकडून आरोपाचे खंडन,महावितरणचा निषेध

नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील घटना, रात्री उशीरापर्यंत पोलीसांत नोंद करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु
शेतकर्‍यांकडून आरोपाचे खंडन,महावितरणचा निषेध

नंदुरबार ।Nandurbar। प्रतिनिधी

तालुक्यातील भालेर, नगाव, तिसी व परिसरातील गावांतील शेतकर्‍यांची (farmers) वीज बीले (Power bills) थकल्याने खोंडामळी सबस्टेशन अंतर्गत असलेल्या 20 ते 22 ट्रान्सफॉर्मरची (transformer) वीज जोडणी खंडीत (Power connection Broken) करण्यात आल्याने शेतकर्‍यांचे रब्बी हंगामातील (Rabbi Hungama) पिकांचे नुकसान (Damage) होत आहे. त्यामुळे वसूलीसाठी गेलेल्या महावितरणच्या 6 कर्मचार्‍यांना भालेर येथील काही शेतकर्‍यांनी चर्चेसाठी बोलावून ग्रा.पं. कार्यालयातच डांबून ठेवल्याचा (Allegedly detained) आरोप कर्मचार्‍यांकडून करण्यात आला आहे. तर दुसर्‍या बाजूला शेतकर्‍यांकडून मात्र महावितरणाच्या धोरणाचा निषेध करण्यात आला असून कर्मचार्‍यांना डांबून न ठेवता केवळ चर्चेसाठी कार्यालयात बोलाविल्याचे सांगण्यात आले. रात्री उशीरापर्यंत याबाबत पोलीसांत नोंद (Report to police) करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती.

नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी उपविभागांतर्गत शेकडो शेतकर्‍यांचे वीज बील थकले आहे. 23 ते 24 ट्रान्सफॉर्मर असून केवळ तीन ते चार ट्रान्सफॉर्मरचे बील जमा झाले आहे. महावितरणकडून मात्र वीज बील भरण्याची सक्ती करण्यात येत आहे. चालू वीज बील शेतकर्‍यांनी भरण्यासाठी महावितरणकडून पाठपुरावा करण्यात येत आहे. उर्वरित 20 ट्रान्सफॉर्मरचे बील थकल्याने दोन दिवसांपासून वीज पुरवठा खंडीत करण्यात आला असून शेतकर्‍यांना वीज बील भरण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. मात्र शेतकर्‍यांनी बील न भरल्याने वीज जोडणी खंडीत करण्यात आली आहे. दरम्यान, आज महावितरणचे कर्मचारी अशोक बागुल, निलेश सोनवणे, दशरथ पाडवी, राजेंद्र भिल, प्रविणपुरी गोसावी, अनिल बोरसे हे भालेर येथे वसूलीसाठी गेले असता तेथील काही शेतकर्‍यांनी त्यांना कार्यालयात चर्चेसाठी निमंत्रीत केले. यावेळी शेतकर्‍यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना बोलवा, अशी मागणी कर्मचार्‍यांसोबत सुरु असलेल्या चर्चेदरम्यान केली. वरिष्ठ येईपर्यंत शेतकरी हलण्यास तयार नव्हते व 6 कर्मचार्‍यांनाही तोपर्यंत ग्रा.पं. कार्यालयातच बसवून ठेवण्यात आल्याचे शेतकर्‍यांकडून सांगण्यात आले. कर्मचार्‍यांकडून मात्र शेतकर्‍यांनी चर्चेसाठी निंमत्रीत करुन डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा आरोप शेतकर्‍यांनी फेटाळला आहे. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये यासाठी तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक योगेश चौधरी पथकासह भालेर येथे दाखल झाले. यावेळी महावितरणचे वरिष्ठ अधिकारीही भालेर येथे पोहचले. मात्र तोडगा न निघाल्याने पोलिस ठाण्यात वाद पोहचला. सायंकाळी उशिरापर्यंत याबाबत पोलीस ठाण्यात नोंद करण्याचे काम सुरु होते. याबाबत भालेर येथील युवराज पाटील, भिका पाटील, राहूल पाटील व दिनेश पाटील यांच्याविरोधात महावितरणने फिर्याद दिली आहे.

भालेर परिसरातील 23 ते 24 ट्रान्सफॉर्मर असून केवळ तीन ते चार ट्रान्सफॉर्मरचे बील जमा झाले आहे. शेतकर्‍यांना गेल्या सात ते आठ महिन्यांपासून केवळ चालू बीले भरण्यासाठी पाठपुरावा करत आहोत. मात्र भालेर येथे वसूलीसाठी गेलेल्या कर्मचार्‍यांना चर्चेसाठी बोलावून ग्रा.पं. कार्यालयात डांबण्यात आले. याबाबत संबंधितांविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करणार आहोत.

- जागृती साळुंख

सहाय्यक अभियंता खोंडामळी उपविभाग, महावितरण

तिसी, नगाव व भालेर येथे शेतकर्‍यांनी बिलाबाबत चर्चा करण्यासाठी बोलावले होते. मात्र चर्चेदरम्यान वरिष्ठांना बोलाविण्यास सांगून आम्हाला कार्यालयातच डांबल्याचे लक्षात आले.

- प्रविण गोसावी, वरिष्ठ तंत्रज्ञ महावितरण

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com