शहादा येथे आज महाराणा प्रतापसिंह यांच्या स्मारकाचे लोकार्पण

शहादा येथे आज महाराणा प्रतापसिंह यांच्या स्मारकाचे लोकार्पण

शहादा Shahada । ता.प्र.-

शहरातील जुना मोहिदा रस्त्यावर स्वामी समर्थ मंदिराजवळ महापुरुष, राष्ट्रगौरव श्री महाराणा प्रतापसिंहजी (Maharana Pratap Singh's) यांच्या स्मारकाचा (memorial) लोकार्पण (Dedication) सोहळा उद्या दि. 3 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. यावेळी जनजागृतीपर सांस्कृतिक कार्यक्रम, ऐतिहासिक देखावा व शोभायात्रा सप्तशृंगी मंदिरापासून ते महाराणा प्रताप चौकापर्यंत निघणार आहे. कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन श्री क्षत्रिय महाराणा प्रतापसिंहजी राजपूत समाज मंडळ शहादा तालुकातर्फे करण्यात आले आहे.

स्मारकाचे उद्घाटन माजी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील उपस्थित राहणार आहेत.

यावेळी आ. राजेश पाडवी, माजी आ. चंद्रकांत रघुवंशी, माजी मंत्री ऍड. पद्माकर वळवी, सातपुडा साखर कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे, उपनगराध्यक्षा रेखाबाई चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अभिजित पाटील, पालिकेचे गटनेते मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल, प्रांताधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे, उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, मुख्याधिकारी दिनेश सिनारे, पोलीस निरीक्षक राहुल पवार, गट विकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे, महाविरसिंह रावल, रवीशेठ राजपूत नरेंद्रसिंग सिसोदिया, वीरेंद्रसिंह गिरासे, मोहितसिंह राजपूत, जितेंद्रसिंह राजपूत, ऍड. स्वर्णसिंह गिरासे, देवेंद्रसिंग रावल, संजय जाधव, राजेंद्रसिंह राजपूत, जितेंद्रसिंह गिरासे, डॉ. संजीव गिरासे, अरुण आप्पा चौधरी, रवींद्र जमादार, अरविंद कुवर, किशोर सिंह गिरासे, सूपडु खेडकर, वाहरू सोनवणे, रवींद्र रावल, नुहभाई नुरानी, श्याम जाधव, अनिल भामरे, रमेशचन्द्र जैन, बापूजी जगदेव, शेख जहीर भाई आदी उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन शहादा तालुका श्री क्षत्रिय महाराणा प्रतापसिंहजी राजपूत मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.