शहादा येथे शिवछत्रपतींच्या अश्वारुढ पुतळयाचे दिमाखात लोकार्पण

शहादा येथे शिवछत्रपतींच्या अश्वारुढ पुतळयाचे दिमाखात लोकार्पण

शहादा । Shahada। ता.प्र.-

आपसातील वाद (Disputes between each other) हे शहर विकासासाठी (City development) घातक ठरतात. यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. शहादा जिल्ह्याची आर्थिक राजधानी आहे. आजच्या कार्यक्रमाला लोकांची उपस्थिती ही खूप काही सांगून जाते. लोकवर्गणीतून पुतळा उभारणे याला वेगळे महत्त्व आहे. थोर पुरुषांची विभागणी लोकं करु लागले हे दुर्दैव आहे. नुसता पुतळा उभारून चालणार नाही तर छत्रपती शिवरायांचे (Chhatrapati Shivaji) विचार (Thoughts) अंगीकारावे (Accept) लागतील. शहरातील सर्वधर्म समभावाला साथ द्या. शिवरायांचा पुतळा शहराच्या सौंदर्यात भर पाडण्याबरोबरच प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी (Former MLA Chandrakant Raghuvanshi) यांनी केले.

शहरातील प्रकाशा बायपास रस्त्यावर शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याचे लोकार्पण (Dedication of the statue) मोठया दिमाखात विविध मान्यवरांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष मोतीलाल पाटील होते.

याप्रसंगी व्यासपीठावर जि.प.अध्यक्षा अ‍ॅड.सीमा वळवी, आ.डॉ.विजयकुमार गावित, आ.जयकुमार रावल, आ.राजेश पाडवी, माजीमंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी, माजी आ.चंद्रकांत रघुवंशी, माजी आ.उदेसिंग पाडवी, सातपुडा साखर कारखाना चेअरमन दीपक पाटील, नगरपालिकेचे माजी गटनेते मकरंद पाटील, नवापूरच्या नगराध्यक्षा हेमलता पाटील, नंदुरबारचे माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख अरुण चौधरी, माजी उपनगराध्यक्ष श्रीमती रेखा चौधरी, शहादा पं.स.उपसभापती वैशाली पाटील, जि.प.चे माजी कृषी सभापती अभिजीत पाटील, देवमोगरा एज्युकेशन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र गावित, प्रांताधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, मुख्याधिकारी दिनेश सिनारे, तालुका कृषी अधिकारी किशोर हडपे, श्रीमती प्रिती पाटील, जि.प.सदस्य हेमलता शितोळे आदी उपस्थित होते.

उपस्थित प्रमुख अतिथींच्या हस्ते रिमोटने बटन दाबून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे लोकार्पण (Dedication of the statue) केले. यावेळी आ.जयकुमार रावल यांनी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या माध्यमातून शहरात सौंदर्यात भर पडली. स्व.पी.के.अण्णा पाटील यांची आठवण करणे क्रमपात्र आहे. त्यांनी परिसराचा विकास केला. शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित रित्या काम करा. महापुरुष हे सगळ्यांचे आहेत. स्मारके जीवनाला प्रेरणादायी (Monuments inspire life) ठरतात असे सांगून शुभेच्छा दिल्या.

आ.डॉ.विजयकुमार गावित (MLA Dr. Vijaykumar Gavit) यांनी सांगितले, जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रित येऊन (All come together) काम करावे. सामाजिक एकतेची शिकवण छत्रपती शिवाजी महाराज यांनी दिली होती. ती आत्मसात करावी. संकुचित वृत्ती बाजूला ठेवून शहराच्या विकास करा, असे आवाहन केले.

आ.राजेश पाडवी, माजी आ.उदेसिंग पाडवी, जि.प.अध्यक्षा अ‍ॅड.सीमा वळवी, दीपक पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष मोतीलाल पाटील (Mayor Motilal Patil) म्हणाले, शहरातील जनतेने पाच वर्षे माझ्यावर खूप प्रेम केले.सर्वांचे सहकार्य घेऊन विकास कामे करण्याचा प्रयत्न केला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या लोकार्पण सोहळा हा सगळ्यात मोठा ऐतिहासिक क्षण आहे असे सांगून शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी कृषी सभापती अभिजीत पाटील यांनी करून शहरातील विकास कामांची व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा उभारण्यासंदर्भात माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन विष्णू जोंधळे यांनी केले.

कार्यक्रमात महिलांची संख्या मोठी होती. परिसर सुशोभित करण्यात आला होता. झेंडे बॅनर फलक लावलेल्या झालर बघता परिसर भगवामय झाला होता. लोकार्पण सोहळ्यावेळी रंगीबेरंगी आतीशबाजी व कागदी फुलांची उधळण करण्यात आली. जिल्हाभरातून लोकार्पण सोहळ्यासाठी हजारो शिवप्रेमींनी गर्दी केली होती. लोकार्पण झाल्यानंतर सुमारे अर्धा तास शिवप्रेमी ढोल ताशांवर जल्लोषात नाचत होते. कार्यक्रमस्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीकांत घुमरे, शहादा पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस अधिकारी राजेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभरातून जादा कुमक मागविण्यात आली होती.

Related Stories

No stories found.