मोड येथे आढळली मृत बिबटयाची मादी

दोन महिन्यातील तिसरी घटना, वनविभागाच्या कार्यप्रणालीबाबत प्रश्‍नचिन्हे
मोड येथे आढळली मृत बिबटयाची मादी

तळोदा/बोरद | ता.प्र./वार्ताहर TALODA

तालुक्यातील मोड येथील दिलीप कत्थु पाटील यांच्या सर्वे नंबर २५ शिवारातील असलेल्या पूरातन विहिरीमध्ये बिबटयाची (leopard) मादी (female) मृतावस्थेत (Dead) आढळून आली. या परिसरात मृत बिबट्या आढळण्याची दोन महिन्यातील ही तिसरी घटना आहे. त्यामुळे वनविभागाच्या (forest department) कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ज्या विहिरीत बिबटया होता ती विहीर कोरडी असून गेल्या २० वर्षापासून या विहिरीत पाणीच नाही. त्यातच बिबटया पाच ते सहा दिवसांपूर्वी विहिरीत पडला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

शेतमालक दिलीप पाटील यांना शेतात दुर्गंधी येत होती. ही दुर्गंधी कुठून येते याचा शोध घेण्यासाठी शेतात सर्वत्र पाहणी केली. शेवटी विहिरीतून दूर्गंधी येत असल्याची खात्री झाली व विहिरीत पाहिले असता त्या ठिकाणी त्यांना बिबटया पडलेला दिसला.

त्यांनी वन विभागाच्या अधिकार्‍यांना दूरध्वनीवरून संपर्क साधला. त्यानंतर वन क्षेत्रपाल निलेश रोडे आणि वन खात्याची संपूर्ण टीम घटनास्थळी पोहोचली. मृतावस्थेतील बिबटयाला त्यांनी विहिरीतून बाहेर काढले. ही या परिसरातील तिसरी घटना आहे.

या बिबटयाचे शवविच्छेदन केले असता बिबटयाची मादी गेल्या तीन दिवसांपूर्वी तोंडावर पडल्याने तोंडाचा भाग सर्व खराब झाला होता. त्यामुळे तिचा आवाज बंद झाला असावा म्हणूनच ती ४ वर्षाची बिबट मादी मेली असण्याची शक्यता असल्याचे तळोदा तालुका पशुधन अधिकारी डॉ.विश्वासराव नवले, मोड येथील पशुवैद्यकीय अधिकारी जमदाळे यांनी सांगितले.

ही मादी ६ फूट लांब होती. वन अधिकारी वनक्षेत्रपाल निलेश रोढे, जी. पी. गांगुर्डे, वनपाल नंदू पाटील, अपर्णा लोहार, डी.आर.खोपे गिरधर पावरा, विरसिंग पावरा, आर.जे.शिरसाठ, डॉ. विश्वासराव नवले, आर.एम.पावरा, बी.एस. जाधव, एस.ओ.नाईक, आर.जे.शिरसाट, व्ही.जे.पावरा, एल.टी.पावरा, वाहन चालक दीपक मराठे, शेतमालक दिलीप पाटील, जितेंद्र पाटील यांच्या उपस्थितीत शेतातच संबंधित बिबटयाचे अंत्यसंस्कार करण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com