तळोदा येथे अवकाळी पावसामुळे मका व सोयाबीनचे नुकसान

तळोदा येथे अवकाळी पावसामुळे मका व सोयाबीनचे नुकसान

सोमावल Somaval । वार्ताहर

तळोदा तालुक्यात अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे (unseasonal rains) कृषी उत्पन्न बाजार समितीत (Agricultural Produce Market Committee) व्यापार्‍यांनी खरेदी केलेले मक्याचे दाणे व सोयाबीनचे (Corn and soybeans) हजारो रुपयाचे नुकसान (Damage) झाले. अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे व्यापार्‍यांची एकच धांदल उडाली.

काल दि.18 रोजी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. पाऊस साधारणपणे अर्धा तास धो धो बरसला. यामुळे बाजार समितीत व्यापार्‍यांनी खरेदी केलेले मक्याचे दाणे व सोयाबीनचा समितीच्या आवारात ढीग केला होता. अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे व्यापार्‍यांची एकच धावपळ व धांदल उडाली. या पावसाने जवळ्पास 50-60 क्विंटल मक्याचे दाणे व 30-35 किंटल सोयाबीन भिजले गेले. बाजार समितीच्या पथारीवर काही काळ डबके साचले होते. दुसरीकडे तालुक्यातील शेतकरी कापसाचे उत्पन्न कमी आल्याने आधीच चिंतेत असतांना या अवकाळी पावसाने यात अधिकच भर घातली आहे. या हंगामात कापूस उत्पादक शेतकर्‍यांचे आर्थिक चक्र पूर्णतः कोलमडले आहे. त्यातच उत्पादनात प्रचंड घट व मजुरीचे दर वाढल्याने कापूस पीक मागील दोन वर्षांपासून न परवडणारे झाले आहे. याशिवाय सोयाबीन पिकाचा एकरी उत्पादन यावर्षी कमी झाल्याने खरीप हंगामात नेमक्या कोणत्या पिकांची लागवड करावी असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर उभा ठाकला आहे.

दरम्यान, या हंगामात कापूस व सोयाबीन उत्पादनात मोठी घट आल्याने कापसाला चांगलाच भाव मिळाला आहे. तथापि सुरुवातीला सोयाबीनला 5100 ते 5400 प्रति क्कीटल भाव मिळाला होता. परंतु हंगामाच्या सरतेशेवटी बाजार समितीत काल झालेल्या सोयाबीनच्या लिलावात उच्चांकी दर 6551 प्रति क्कीटल भाव मिळाला.

Related Stories

No stories found.