सर्ज्या-राजाला सजविण्याच्या साहित्य खरेदीसाठी शेतकर्‍यांची गर्दी

सर्ज्या-राजाला सजविण्याच्या साहित्य खरेदीसाठी शेतकर्‍यांची गर्दी

नंदुरबार Nandurbar। प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्यात पावसाने दडी मारली असली तरी बैलांबाबत Bulls कृतज्ञता Gratitude व्यक्त करण्यासाठी शेतकरी पोळा Pola साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. नंदुरबार शहरात पोळयाच्या पुर्व संध्येला बाजार पेठ Bazaar Peth गजबली होती. शेतात राबणार्‍या लाडक्या सर्ज्या-राजाला सजविण्यासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी बाजार पेठेत शेतकर्‍यांनी गर्दी केली होती.

जिल्हाभर दि.6 सप्टेंबर रोजी बैल पोळा साजरा होणार आहे. त्या पार्श्वभुमीवर बाजारपेठेत गेल्या आठवडयापासून सर्ज्या-राजाला सजविण्यासाठी लागणारे साहित्य विक्रीसाठी आले आहे. शेतकर्‍यांमध्ये पोळा सणाला महत्वाचे स्थान दिले जाते. वर्षभर उन्हाताणात बैल शेतकर्‍यांना मशागतीला मोलाचा हातभार लावतात. यांत्रिकी करणारे शेतकर्‍यांच्या दारोदारी ट्रॅक्टर असले तरी बैलांचे महत्व अद्याप कायम आहे.

नंदुरबार शहरातील मंगळ बाजारात बैलांना सजविण्यासाठी विविध रंगाचे गोंडे, बेकडी, कासरे, दोर वेगवेगळे साहित्य विविध रंगीत गळयात घालायच्या माळा नव्याने बाजारात आलेले बहुरंगी मणी, मण्यांचा माळा यासह विविध साहित्य खरेदीसाठी शेतकर्‍यांची आज बाजार पेठेत गर्दी दिसून आली. या साहित्यांच्या किंमती गेल्या वर्षाचा तुलनेत काही प्रमाणात वाढलेल्या आहेत.

यंदा पाऊस कमी झाला असला तरी शेतकरी बैल पोळा साजरा करण्यासाठी सज्ज झाला आहे. पोळयाच्या पुर्वसंध्येला शेतकर्‍यांनी सजविण्यासाठी साहित्य खरेदी केले आज शहरात खेडयातून साहित्य खरेदीसाठी आलेले शेतकरी दिसून येत होते. दरम्यान बाजार पेठेत मातीचे व प्लास्टर ऑफ पॅरीस बैल 20 रूपयापासून ते 50 रूपयापर्यंत विक्रीला उपलब्ध होते. मातीचे बैल विक्रेत्यांनी सुभाष चौक, मंगळ बाजार याठिकाणी तात्पुरती दुकाने थाटली होती.

गेल्या वर्षापेक्षा यंदा बैलांना सजविण्यासाठी लागणारा साहित्यात किंचीत वाढ झालेली दिसली. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण अल्प असले तरी शेतकरी राजाच्या चेहर्‍यावर याबाबत कुठलाही भाव दिसून येत नव्हता. उत्साहात खरेदीसाठी त्याने बाजारपेठेत गर्दी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com