सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हे

सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हे

नंदुरबार Nandurbar । प्रतिनिधी

सरकारी कामात (government work) अडथळा (obstructing) आणून पोलीस (police) अधिकारी व कर्मचार्‍यांना मारहाण (Beating) केल्याप्रकरणी कोरीट ता.नंदुरबार येथील दोन तर शहादा तालुक्यातील पाच जणांविरुद्ध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे (Crime) दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मतदारांना शिवीगाळ करु नका व आरडाओरड करु नका असे पोलीसांनी सांगितल्याचा राग आल्याने कोरीट ता.नंदुरबार येथील अनिल रमेश कोळी व गोपाळ शांतीलाल कोळी यांनी पोलीस शिपाई अनिल जिभाऊ बिर्‍हाडे यांची कॉलर पकडून शिवीगाळ केली तसेच हाताबुक्क्यांनी व काठीने मारहाण केली. तसेच नेमप्लेट तोडून टाकली. त्यानंतर समजावण्यासाठी आलेल्या महिला अधिकार्‍यालादेखील शिवीगाळ करुन शासकीय कामात अडथळा आणला.

याप्रकरणी बिर्‍हाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दोघांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी करीत आहेत.

दुसर्‍या घटनेत, प्रतिबंधीत क्षेत्रात ठेवलेल्या टेबल व खुर्च्या प्रतिबंधीत क्षेत्राबाहेर ठेवण्यास सांगितल्याचा राग आल्याने शहादा येथील विद्याविहार येथील संजय ओंकार पाटील, दीपक भिला चौधरी, हर्षद भिला पटेल, पंकज सुधीर चौधरी, कैलास ओंकार पाटील यांनी गैरकायद्याची मंडळी गोळा करुन सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप सहदेव अराक यांची कॉलर पकडून धक्काबुक्की केली व शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

याबाबत अराक यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहादा पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com