अक्कलकुवा येथे विना परवानगी मोर्चा काढण्याचा प्रयत्न ; 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अक्कलकुवा येथे विना परवानगी मोर्चा काढण्याचा प्रयत्न ; 25 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार - प्रतिनिधी nandurbar

प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा अवमान करणाऱ्या (Tripura) त्रिपुरा राज्यात घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी (Akkalkuwa) अक्कलकुवा येथे विना परवानगी मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला म्हणून २५ जणांच्या जमावा विरुद्ध अक्कलकुवा (police) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्रिपुरा राज्यातील कथित घटनेचा निषेध म्हणून मुस्लिम समाजातील काही कार्यकर्त्यांनी अक्कलकुवा येथील हॉटेल फ्रेंड पासून मोलगी नाक्याच्या मार्गे तहसील कार्यालयावर रॅली नेण्याचा प्रयत्न झाला.

याप्रकरणी पो.ना. अमोल खवळे यांच्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात मोहसीन रफिक मक्राणी, रईस अली शेख, हमजु मोहम्मद मक्राणी, मुल्ला अल्लारखा नमुद मक्राणी, जुनेद अमीन मक्राणी, बिलाल युसुफ मक्राणी, लाला रफिक मक्राणी, मुफतलीक मुसा मक्राणी, शोएब शफि मोहम्मद मक्राणी, साजीद छोटुखॉ पिंजारी, राजु शेरू मक्राणी, युनुस शौकत मक्राणी, जाकीर शेख पूर्ण नाव माहित नाही सर्व रा.अक्कलकुवा व इतर १० ते १५ इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर हे करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com