नुपूर शर्मा यांचा पुतळा जाळला

नंदुरबारात आठ जणांविरुद्ध गुन्हा
नुपूर शर्मा यांचा पुतळा जाळला
crime news

नंदुरबार | प्रतिनिधी- NANDURBAR

येथील सुतार मोहल्ला परिसरात भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचा पुतळा दहन करुन घोषणाबाजी केल्याप्रकरणी आठ जणांविरुद्ध शहर (police) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदुरबार जिल्हयात जिल्हाधिकार्‍यांचा मनाई आदेश असतांनाही शहरातील सुतार मोहल्ला परिसरात काल सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास भाजपाच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचा पुतळा दहन करुन त्यांच्याविरोधात आक्षेपार्ह घोषणाबाजी केल्याप्रकरणी

रियाज अहमद सैय्यद (रा.चिराग गल्ली, नंदुरबार), सोहेल मिर्झा (रा.खिलापत चौक, नंदुरबार), शोएब चायना, साजि, मुजाहिद (तिन्ही रा.गाझीनगर नंदुरबार) व अन्य तिन जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात महराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) चे उल्लंघन १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलीस शिपाई शैलेंद्र माळी यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास असई सादीक शेख करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com