रस्त्यांच्या भुमिपूजनावरुन भाजप आमदार-खासदारांमध्ये श्रेयवाद

आ.राजेश पाडवींनी केले भुमिपूजन, खा.गावितही करणार भुमिपूजन
रस्त्यांच्या भुमिपूजनावरुन भाजप आमदार-खासदारांमध्ये श्रेयवाद

मोदलपाडा/सोमावल ता.तळोदा - वार्ताहर SOMAVAL

राज्यातील (bjp) भाजपाच्या १०५ आमदारांना (Central government) केंद्र शासनाच्या सेंट्रल रोड अँड इंन्फ्रास्ट्रक्चर फंड (Central Road and Infrastructure Fund) अर्थात सीआरआयएफ (CRIF) योजनेतून प्रत्येकी १० कोटी रुपयांचे रस्ते केंद्रीय रस्ते वाहतूक (Central road transport) आणि (Highway) महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मंजूर केले आहेत. तसे पत्र प्रत्येक भाजपा (mla) आमदारांना देण्यात आले आहेत. मात्र, तरीही खा.डॉ.हीना गावित (mp Dr.Heena Gavit) मला डावलून या रस्त्याच्या भुमिपूजनाचा कार्यक्रम घेत आहेत. आम्हाला डावलून हा कार्यक्रम होत असेल तर तो होवू देणार नाही असा इशारा देत आमदारांना मंजूर झालेल्या कामाचे श्रेय खा.डॉ.गावित लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप (mla Rajesh Padvi) आ.राजेश पाडवी यांनी पत्रकार परिषदेत केला. आ.पाडवी यांच्या आक्रमक भुमिकेमुळे सोमावल येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उपस्थित होवू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, आ.पाडवी यांनी बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांच्या उपस्थितीत या कामाचे भुमिपूजन करुन टाकले. सायंकाळी खा.डॉ.गावितांच्या उपस्थितीत पुन्हा या रस्त्याचे भुमिपूजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. भाजपाच्या दोन्ही लोकप्रतिनिधींमध्ये सुरु असलेल्या या श्रेयवादामुळे भाजपामधील अंतर्गत कलह चव्हाटयावर आला आहे.

आ.राजेश पाडवी यांनी आज त्यांच्या सोमावल ता.तळोदा येथील फार्म हाऊसवर पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सभापती यशवंत ठाकरे, पं.स सदस्य दाज्या पावरा, पं.स सदस्य विजयसिंग राणा, जिल्हा पं.स. सदस्य महेंद्र पवार, जि.प.सदस्य प्रकाश वळवी, विक्रम वळवी, जि.प.समस्य भरत पवार, स्वीय सहाय्यक विरसिंग पाडवी, विठ्ठल बागले, बळीराम पाडवी, गोपी पावरा यावेळी उपस्थित होते.

आ.राजेश पाडवी म्हणाले की, केंद्र शासनाच्या सी आर आय एफ योजनेतून केंद्रीय मंत्री ना.नितीन गडकरी यांनी राज्यातील भाजपाच्या सर्व १०५ आमदारांना प्रत्येकी १० कोटीचा निधी मंजूर केला आहे.

यात राष्ट्रीय महामार्ग ७५३ बी ते सोमावल तर नर्मदानगर एम डी आर १ ते एम डी आर ४४ पर्यंत एकूण ६ कि.मीच्या या रस्त्याचाही समावेश आहे. यासाठी लागणारा निधी नंदुरबार चा सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग देखील करण्यात आला.

परंतु खा.डॉ.हिना गावित या निधीसाठी आपल्या प्रयत्नाने मिळवून दिला असे भासवून जनतेच्या डोळयात धूळफेक करीत आहेत. या रस्त्याच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांनी निविदा प्रक्रिया राबवली.

नंदुरबार येथील मे.महेश इन्फ्रास्ट्रक्चर चे मालक महेश चौधरी यांनी १०.२२ टक्क्यांनी बिलो निविदा अंदाजीत ४५ लाख रुपये कमीने भरली. त्यामुळे त्यांना या रस्त्याचे काम मिळाले आहे. त्यांना या रस्त्याच्या कामाचा प्रारंभ आदेशही देण्यात आला.

परंतु खा.डॉ.हिना गावित यांनी हे काम मीच आणले आहे असे भासवून सार्वजनिक बांधकामाच्या अधिकारी वर्गावर दबाव आणून या रस्त्याच्या भूमिपूजन करण्याचा घाट घातला आहे. परंतु सदर रस्त्याचा कामाचा निधी बाबतीत सर्व दस्तऐवज व पुरावे त्यांनी जाहीर करावे.

केंदीय मंत्री नितीन गडकरी यांचे या कामाचा निधी मंजुरीचे पत्र आ.राजेश पाडवी यांच्या नावाने पाठवल्याचा पुरावा त्यांनी यावेळी सादर केला. त्यामुळे खा.गावित यांनी आम्हाला डावलून या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ केला तर हा कार्यक्रम आम्ही उधळून लावू, असा इशारा दिला.

त्यांनी कार्यक्रमाला जरुर यावे, परंतू आम्हाला विश्‍वासात घ्यावे. आम्हालाच नव्हे तर विकास कामासाठी इतर पक्षाच्याही लोकप्रतिनिधींना सहभागी करावे. मात्र, केवळ कामाचे श्रेय लाटण्यासाठी खा.गावित कामाचे भुमिपूजन करण्याची घाई करत आहेत.

यापुर्वी अनेक आरोग्य केंद्रे, इमारतीचे उद्घाटन झाले त्यावेळी खा.गावित का आल्या नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. आ.पाडवी यांच्या आक्रमक भुमिकेमुळे संभाव्य कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न बघता पोलीस यंत्रणेने सज्ज होवून सोमावल येथे मोठा बंदोबस्त लावला होता.

नंदुरबार येथील दंगा नियंत्रण पथक व पोलीस कुमक मागविण्यात आली होती. सोमावल येथे उपविभागीय पोलीस अधिकारी संभाजी सावंत, तळोदा पोलीस निरीक्षक केलसिंग पावरा यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होत

आ.पाडवी यांनी केले भुमिपूजन

सोमावल ते नर्मदानगर या रस्त्याच्या कामासाठी आ.राजेश पाडवी व खा.डॉ.हिना गावित यांच्यात श्रेयवादाची लढाई सुरु असताना आज सदर रस्त्याचे भूमिपूजन दोन्ही नेते एकाचवेळी करणार होते. म्हणून हा वाद टोकाला जावून सोमावल येथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उपस्थित होवू नये यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाने दोन्ही नेत्यांच्या उदघाटनावरील वादावर मार्ग काढत आधी दुपारी दोनच्या सुमारास आ.राजेश पाडवी यांच्या हस्ते या रस्त्याचे भूमिपूजन उरकून घेतले. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता नितीन वसावे उपस्थित होते. तर पुन्हा या रस्त्याचे भूमिपूजन आजच संध्याकाळी पाच वाजेला खा.हिना गावित यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे समजते.

पक्षाकडे तक्रार करणार

खा.डॉ.हिना गावित या भाजपाच्याच असल्याने त्यांच्या या श्रेयवादाच्या प्रकरणाची मी पक्षश्रेष्ठी व पक्ष संघटनेकडे तक्रार करणार असल्याचे यावेळी आ.राजेश पाडवी यांनी सांगितले. यावरून भाजपातील अंतर्गत वाद हा पुन्हा एकदा चव्हाटयावर आला आहे. याबाबत पक्ष संघटनेकडून कोणती भूमिका घेण्यात येते, याबाबत लक्ष लागून आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com