कोरोना योद्धांचा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते सत्कार

कोरोना योद्धांचा माजी आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते सत्कार

नंदुरबार ।Nandurbar । प्रतिनिधी

कोरोना महामारी (Corona epidemic) च्या काळात आपले कर्तव्य करीत असताना ज्यांनी रुग्णांची सेवा (Patient service) करून मदत केली. त्या मदत करणार्‍या व्यक्तीला तो रुग्ण त्याच्यासाठी परमेश्वर होता असे प्रतिपादन माजी आ.चंद्रकांत रघुवंशी (Former MLA Chandrakant Raghuvanshi) यांनी कोरोना योद्धाचा सत्कार प्रसंगी केले.

येथील नगरपालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी सभागृहात कोरोना योध्दाचा सत्कार कल्चरलं फाउंडेशन तर्फे माजी आ. चद्रकांत रघुवंशी यांचा हस्ते करण्यात आला.यावेळी प्रमुख अतिथी नगरपालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे , बीएड कॉलेजचे प्राचार्य डॉ मुकेश रघुवंशी व पाणीपुरवठा सभापती कैलास पाटील हे होते.

यावेळी श्री रघुवंशी पुढे म्हणाले की, कोरोना महामारीच्या काळात अनेकांनी मदत केली आपल्या सेवेची जाण ठेवली तर काहीनी फायदा ही घेतला. कोरोना काळात या सर्व कोरोना योद्धांनी कर्तव्य म्हणून सेवा केली. यात डॉक्टर, नर्स, सफाई कर्मचारी यांच्यासह विविध जणांनी सेवा दिली त्यांनी आपला सन्मान होईल या हिशोबाने नव्हे तर कर्तव्य म्हणून आपले काम केले आज त्यांच्या कल्चरल फाउंडेशन मार्फत सन्मान करून त्यांच्या कार्याची दखल घेण्यात आली ते कौतुकास्पद आहे.

यावेळी डॉक्टर, नर्स ,आरोग्य कर्मचारी असे 90 कोरोना योध्दाना प्रमाणपत्र ट्रॉफी देऊन माजी आ चद्रकांत रघुवंशी यांच्य हसो सन्मानित करण्यात आले. मनीषा गावित व सचिन दवे यांनी कोरोना काळातील आपले अनुभव कथन केले, सिव्हिल हॉस्पिटलचे,नगरपालिकेचे व खाजगी डॉक्टर ,नर्सेस व आरोग्य कर्मचारी या कोरोना योद्धांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे संचालन कल्चरल फौंडेशनचे अध्यक्ष राजेश रघुवंशी ,अपूर्व पटेल, कमलाकर बागुल दुर्गेश वैष्णव ,शशी हनवते, जितेंद्र खवळे,काशीनाथ सूर्यवंशी परेश रावल ,डॉ सपना अग्रवाल,राजेश अग्रवाल, डॉ.विजय पटेल,कृष्णा बोरसे विजय खवळे यांनी केले.

सूत्रसंचालन केशव राजभोज प्रास्ताविक संस्थेचे सचिव सुभाष मोरावकर यांनी केले . आभार प्रोजेक्ट चेअरमन श्रीराम मोडक यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com