
नंदुरबार | प्रतिनिधी nandurbar
नंदुरबार जिल्हयात पुन्हा (corona) कोरोनाचा शिरकाव झाला आहे. काल (pune) पुण्याहून नंदुरबारला आलेल्या रुग्णाला त्रास जाणवू लागल्याने त्याची (RTPCR Test) आरटीपीसीआर तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. दरम्यान, नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घ्यावी व कोरोनाचे नियम पाळावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे (District Surgeon Dr. Charudatta Shinde) यांनी केले आहे.
पुणे येथून काल नंदुरबारला आलेला एक जण आजारी पडला. त्याला असलेल्या लक्षणांवरुन कोरोना चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
परंतू नागरिकांनी घाबरु नये, गर्दीमध्ये जाणे टाळावे, कोरोनाचे नियम पाळावे, मास्कचा वापर करावा, वारंवार साबणाने हात स्वच्छ धुवावे, जेणेकरुन कोरोनाचा प्रसार होणार नाही, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.चारुदत्त शिंदे यांनी केले आहे.